प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांना रोटरीचा पुरस्कार
schedule25 Sep 23 person by visibility 392 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रोटरी क्लबच्या इंडिया लिटरसी मिशन अंतर्गत दिला जाणारा नेशन बिल्डर अॅवार्ड २०२३ हा पुरस्कार न्यू पॉलिटेक्निक उचगांवचे प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांना प्रदान करण्यात आला. शाहू स्मारक भवन येथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील ( होते. रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरीयन नासिर बोरसादवाला अध्यक्षस्थानी होते. शिक्षण संस्थांमधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व ज्यांच्या कार्यातून विद्यार्थी घडविण्याच्या प्रक्रियेत सकारात्मक बदल घडले आहेत अशा शिक्षक व प्राध्यापक यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. यावेळी रोटरी क्लबच्या विविध युनिट्सचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.