+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule11 Mar 23 person by visibility 911 categoryगुन्हे
सांगली ‘लाचलुपत’ची कारवाई
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
फसवणुकीचा गुन्हा नोंद न करण्यासाठी आठ लाखाची लाच घेणारा जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश सिद्धराम म्हेत्रे आणि पोलिस हवालदार रुपेश तुकाराम कुंभार या दोघांना सांगली लाचलुपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोल्हापूरात येऊन कारवाई केल्याने कोल्हापूर पोलिस दलात एकच खळबळ उडाली. लाच घेणाऱ्या दोघांविरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू झाले आहे.
पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रारदार आणि त्यांच्या आत्यांचा मुलगा यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश म्हात्रे यांनी आठ लाख रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने काल शुक्रवारी १० मार्चरोजी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलिसांनी तक्रारदाराच्या अर्जाची खातरजमा केली असता म्हात्रे याने लाच मागितल्याचे निष्पण्ण झाले.
त्यानंतर सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तातडीने कारवाई करत सापळा रचला. शुक्रवारी मध्यरात्री एनसीसी भवन येथे आठ लाख रुपयांची लाच घेताना सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हात्रे आणि हवालदार तानाजी कुंभार यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाले.
सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील, कोल्हापूर पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे, पोलिस निरीक्षक विनायक भिलारे, पोलिस हवालदार प्रितम चौगुले, धनंजय खाडे, अजित पाटील, ऋषीकेश बडणीकर, अतुल मोरे, रामहरी वाघमोडे, उमेश जाधव, अनिस वंटमोरे यांनी कारवाईत भाग घेतला.