+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustआंबा महोत्सवाला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद adjustशिवाजी विद्यापीठात शुक्रवारपासून तिसरे राज्यस्तरीय अक्षर संमेलन ! ३०० कलाकार होणार सहभागी adjust टेनिस स्पर्धेत नऊ मानांकित खेळाडूंचे आव्हान संपुष्टात adjustकोल्हापुरात रविवारी गुरुवंदना महोत्सव adjustगावात नो डॉल्बी, नो डिजीटल फलक ! शांतता-सामाजिक सलोख्याचा माणगाव पॅटर्न !! adjustन्यू मॉडेल ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९९.४९ टक्के adjustकोल्हापुरातील १९० शाळांना मोफत पाठयपुस्तक वाटपास प्रारंभ adjustजिल्हातंर्गत बदली प्रक्रिया सुरू करावी, पुरोगामीचे ग्रामविकासला निवेदन adjustनिधी खर्चावर सीईओंचे लक्ष, अधिकाऱ्यांना सक्त सूचना ! adjustगोखले कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत यश
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule12 Apr 24 person by visibility 128 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दि प्राथमिक शिक्षक बँकेतील राजकारणाला पुन्हा एकदा उकळी फुटली आहे. अमृत संजीवनी योजनेवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर सत्ताधारी मंडळींनी त्या आरोपांन सडेतोड उत्तर देत बँकेच्या विक्रमी नफ्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठला असा पलटवार केला. दरम्यान बँकेचे माजी संचालक प्रसाद पाटील यांनी बँकेच्या कामकाजावरुन सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार सुरू केला आहे. त्याला सत्ताधारी आघाडीतील एक नेते रवि पाटील हे जशास तसे उत्तर देत आहेत. हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.
पुरोगामी शिक्षक संघटनेचे प्रसाद पाटील यांनी म्हटले आहे, ‘प्रधान कार्यालय व्यतिरिक्त आपल्या बँकेस ११ शाखांनाच रिझर्व्ह बँकेची मंजुरी आहे.* यांच्याच काळात मुख्य शाखेची फोड करून मुख्य शाखा १ व मुख्य शाखा २ असा भाग करून १२ वी शाखा यांच्याच काळात सुरू केली. मुख्य शाखेचा एक भाग पहिल्या मजल्यावर व दुसरा भाग बेसमेंटच्या पोटमाळ्यावर होता हे सर्व सभासदांना माहिती आहे. *मी तर सभासद झाल्यापासून म्हणजे १९९४ ला सभासद झाल्यापासून हे दोन भाग पाहतोय.* सदर जादा शाखेस कधी करवीर, कधी पन्हाळा तर कधी गगन बावडा नावाने संबोधले गेले. कारण मुख्यशाखेत या तीन्ही तालुक्यातील शिक्षकांची खाती होती व आहेत. शिवाय कागल न.पा.शिक्षकांचीही खाती मुख्य शाखेत होती व आहेत. मुख्य शाखा नं.२ (पन्हाळा शाखा खरंच) अस्तित्वात आहे का?*
नसेल तर स्टापिंग पँटर्न मध्ये कसा उल्लेख आला ? मला समजलेल्या माहिती प्रमाणे या जादा शाखेचा उल्लेख २००३ च्याच स्टापिंग पँटर्न मध्ये आला होता. त्यावेळी सत्ता यांचीच होती. २००३ स्टापिंग पँटर्न मध्ये पन्हाळा शाखा स्वतंत्र दाखवून १४६ चा स्टापिंग पँटर्न मंजूर करून घेतला होता. आम्ही सदर पँटर्न संख्या कमी करून १२९ वर आणण्यास भाग पाडले. हे आमच्या सोबत राहिलेल्या विरोधी संचालकांनाही माहिती आहे.’
   शिक्षक संघ थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष रवी पाटील यांनी उत्तर देताना म्हटले आहे, ‘आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून असे व्यक्तिमत्व म्हणजे प्रसाद पाटील होय. २००३ चा जो स्टॉपिंग पॅटर्न १४६ कर्मचाऱ्यांचा मंजूर झाला त्यावेळी रवीकुमार पाटील, बाळकृष्ण पवार रघुनाथ खोत हे कुणीही संचालक नव्हते पन्हाळा नावाची शाखा २००३ च्या स्टॉपिंग पॅटर्न मध्ये होती तर तुम्ही त्याविषयी आवाज का उठवला नाही ?  आम्ही तर संचालक नव्हतो व दुसऱ्यावर आरोप सुद्धा करत नव्हतो ? मी अकरा वर्ष संचालक,  व्हाईस चेअरमन व चेअरमन म्हणून काम केले आहे आम्ही एक सुद्धा नोकरभरती केली नाही. कारण उत्पनातील दीड ते दोन टक्के खर्च  कर्मचारी पगार भत्यावर होत होता. आम्ही संचालक असताना पन्हाळा नावाची शाखा अस्तित्वात नव्हती नुकतीच वारणा कडोली व हलकर्णी शाखा मंजूर झालेल्या होत्या तत्कालीन चेअरमन एके पाटील यांनी सभासदांच्या सोयीसाठी मुख्य शाखा एक व दोन केल्या मात्र रिझर्व बँकेने त्याची दखल घेऊन बँकेवर कारवाई केली पण ते करण्यामागे संचालकांचा स्वार्थ नव्हता तर सभासदांची सोय करणे हा हेतू होता. त्याच ए के पाटील रघुनाथ खोत यांच्या व बाळासो पवार यांच्या मदतीने त्यांच्या संघटनेच्या मतावर आपण निवडून आलात ते चालते . रिझर्व बँक मंजुरी नाही हे तुम्हाला ठाऊक असताना त्त्यानंतर ही जास्त नोकर भरायच्या स्वार्थापोटी बँकेच्या अहवाल किंवा इतर कोणत्याही कागदपत्रावर पन्हाळा शाखां नसताना फक्त स्टॉपिंग पॅटर्नच्या सभासदांपुढे न जाणाऱ्या तिजोरीतील कागदावर बदल करण्यात आला त्या पाठीमागे सभासदांची सोय हा हेतू नव्हता तर जादा नोकर भरती चा अशुद्ध हेतू होता