Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषद शिवसेनेच्या गटनेतेपदी अरुण जाधव ! यड्रावकर गट शिवसेनेसोबतच!! कोल्हापूरकरांचे प्रेम हे कलावंताला प्रेरणादायी: अभिनेते सुनील बर्वे शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात अंकुरम स्पर्धा, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागउमराणीतील सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारक सुशोभिकरणाचा नियोजनबद्ध प्रस्ताव सादर करावाशाहू मिलमधील आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत गुरुवारी  मंत्रालयात बैठकमहापालिकेत पुन्हा सत्तासंघर्ष !अकरा मार्चला स्थायी, परिवहनच्या सभापतीची निवड !!शाहू महाराज हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून वैज्ञानिक प्रयोगसंजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहात जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी नंदिप मोरे, व्हाईस चेअरमनपदी जयकुमार रेळेकर प्रज्ञाशोध चाळणी परीक्षा ३५५ केंद्रावर

जाहिरात

 

जिल्हा परिषद शिवसेनेच्या गटनेतेपदी अरुण जाधव ! यड्रावकर गट शिवसेनेसोबतच!!

schedule03 Mar 26 person by visibility 143 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या नूतन सदस्यांचा सत्कार वगटनेतेपदाची निवड सोमवारी (2 मार्च 2026 ) पार पडली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैयशील माने,  माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सुजित मिणचेकर, उल्हास पाटील,  शिवसेना जिल्हाप्रमुख विजय बलगुडे, रवींद्र माने, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण इंगवले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्किट हाऊस येथे ही बैठक झाली.या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य अरुण मारुती जाधव यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आल्याची घोषणा खासदार माने यांनी केली. याप्रसंगी गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव, हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील, बाबा नांदेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबुराव मकानदार आदी उपस्थित होते. शिवसेनेचे एकूण नऊ सदस्य निवडून आले आहेत. दरम्यान शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राजर्षी  शाहू आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. त्यांच्या नेतृत्वाखालील आघाडीतून चार सदस्य निवडून आले आहेत. या आघाडीचे चारही सदस्य सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीला उपस्थित होते. यावेळी त्यांचाही सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेमध्ये यड्रावकर गट हा शिवसेनेसोबत असल्याचे स्पष्ट झाले.

 याप्रसंगी जिल्हा परिषदेचे नूतन सदस्य  अरुण जाधव, इंद्रजित पाटील, शिवाजी जाधव, अमोल चव्हाण,अतिश शिंगे,  अर्चना निकम, रोहिणी आबिटकर, सरिता नांदेकर, वर्षाराणी पाटील, प्रचिता कोळी,श्रद्धा गायकवाड, उत्तरा शिंदे, वर्षा सावर्डेकर यांचा सत्कार करण्यात आला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes