Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे " संतांचे संगती " निरुपणास प्रारंभ साहित्यिक प्रा.चंद्रकुमार नलगे हे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचा कणा : डॉ. शशिकांत चौधरीसाथी भरत लाटकर यांना आझादी की जंगच्या  कलाकारांनी मुंबईत श्रद्धांजलीहमारी बेटियाँ भी…बेटों से कम हैं क्या...!" मार्केट सेसविरोधात कोल्हापुरातून एल्गार, दोन ऑक्टोबरपर्यंत सरकारला अल्टिमेटम! अन्यथा पाच लाख व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन ! !माजी राज्यपाल डॉ. डी वाय पाटील यांचे निधनप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये गुणगौरव समारंभ - गणवेश वाटपमहालक्ष्मी बँकेच्या अध्यक्षपदी केदार हसबनीस, उपाध्यक्षपदी कृष्णा पाटीलकचरा वर्गीकरणासाठी पंधरा ऑगस्टपर्यंत ग्रामपंचायतीना डेडलाइन -  सीईओ डॉ.जॅसमिन शंभर टक्के निधीसाठी जिप सदस्य भेटले मंत्र्यांना ! मंगळवारी मुंबईत आबिटकर -मुश्रीफांत चर्चा !!

जाहिरात

 

एकच जिद्द - शक्तिपीठ महामार्ग रद्द ! संघर्ष समितीतर्फे कोल्हापुरात धरणे आंदोलन!!

schedule12 Aug 24 person by visibility 931 categoryराजकीय

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा आवाज बुलंद झाला. सोमवारी 12 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर दिवसभर धरणे आंदोलन केले. सरकारकडून शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील असा निर्धार यावेळी करण्यात आला. कोल्हापुरात लवकरच शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात परिषद घेण्याची घोषणाही केली.
 शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्यावतीने या आंदोलनाचे आयोजन केले होते.  "शक्तीपीठ महामार्ग हा कोणाच्या उत्कर्षासाठी आहे हे एकदा सरकारने जाहीर करावे. कंत्राटदारांची खिसे भरण्यासाठी हा सारा खटाटोप सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ होऊ देणार नाही हा आमचा निर्धार कायम आहे" असे माजी आमदार संजय घाटगे यांनी सांगितले. आमदार ऋतुराज पाटील यांनी शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध कायम राहील असे ठणकाले. आंदोलनस्थळी "शेतकरी एकजुटीचा विजय असो, एकच जिद्द शक्तिपीठ महामार्ग रद्द, शेती आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची" अशा घोषणा देण्यात आल्या. खासदार शाहू महाराज म्हणाले, "शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रारंभापासून विरोध आहे. लोकांची मागणी नसताना सरकार हा शक्तिपीठ महामार्ग कशाला तयार करत आहे. सरकारने भूमिका स्पष्ट करायला पाहिजे. शक्तीपीठ महामार्ग जनतेला नको आहे. कोणत्याही शेतकऱ्याची शक्तिपीठ महामार्ग झाला पाहिजे अशी इच्छा नाही. शक्तिपीठ महामार्ग कोणासाठी आहे हे जनतेच्या लक्षात येत आहे. शेतकऱ्यांनी एकत्र राहून सरकारवर दबाव टाकून शक्तीपीठ महामार्ग रद्द करू या. जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील" याप्रसंगी इरिगेशन फेडरेशनचे  विक्रांत पाटील, गिरीश फोंडे, शिवाजी मगदूम, प्राचार्य मधुकर बाचुळकर आदींची भाषणे झाली. आंदोलनात मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, कॉम्रेड सम्राट मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वैभव कांबळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes