मुलींच्या लैगिंक अत्याचार विषयात कोणत्याही पक्षाने राजकारण करू नये –शौमिका महाडिक
schedule23 Aug 24 person by visibility 996 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोलकत्ता, बदलापूर आणि शिये येथील मुलीच्या लैंगिक अत्याचाराच्या घटना या अमानवीय आहेत. त्या घटनेचा आम्ही निषेध करतो. यातील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. याविषयी राज्य सरकार आणि पोलिस प्रशासन अतिशय गांभीर्य आहे. सरकार संवेदनशील आहे. मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी कोणत्याही पक्षाने राजकारण आणू नये. अशी भूमिका भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा व गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी मांडली.
पत्रकार परिषदेत बोलताना महाडिक या भावूक बनल्या होत्या. मुलींच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या या घटना मनाला खूप वेदना देणाऱ्या आहेत. एक स्त्री, एक आई म्हणून त्या घटनेचा मी निषेध करते. शिये येथील त्या मुलीच्या आईचा आक्रोश हा हृदय पिळवटून टाकणारा होता. हे सांगताना महाडकि यांच्या डोळयाच्या कडा ओलावल्या होत्या.
दरम्यान बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडीने शनिवारी, महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्या अनुषंगाने बोलताना महाडिक म्हणाले,‘बदलापूर येथील घटनेचा तपास सुरू आहे. सरकार संवेदनशील आहे. गृहखातं सक्षम आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करुन घेण्यास विलंब लावलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे. तर कोल्हापूर जवळील शिये येथील दहा वर्षीय मुलींवरील अत्याचाराच्या घटनेचा पोलिसांनी जलदगतीने तपास केला. आरोपीला ताब्यात घेतले. यामुळे या विषयावरुन कोणीही राजकारण करू नये. ’
……………………
लाडकी बहिण योजना महिलांना आर्थिक सुरक्षा पुरविणारी
‘लाडकी बहिण योजना ही महिलांना आर्थिक सुरक्षा पुरविणारी आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचा प्रयत्न आहे. तेव्हा लाडकी बहिण योजना आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना या दोन्हीचा संबंध जोडू नये. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही राजकारण करू नये. ’