Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवकालीन बारा किल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन ! पन्हाळा, रायगड, प्रतापगडचा समावेश शक्तीपीठ महामार्गवरुन शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरविण्याचा विरोधकांचा प्रयत्न : आमदार राजेश क्षीरसागरमहानंदा मोहिते यांच्या घुंगुरमाळा कवितासंग्रहाचे शनिवारी प्रकाशनआई अंबाबाई, शक्तिपीठ महामार्ग रद्द होऊ दे ! शेतकऱ्यांची शेती वाचू दे !!शिक्षक - संस्था चालकांनी उगारली आंदोलनाची छडी ! अन्यायी संच मान्यतेच्या विरोधात कोल्हापुरात जंगी मोर्चा !!कोल्हापुरात वंध्यत्व विषयक दोनदिवसीय कार्यशाळानूतन मराठी विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरीपाचवी शिष्यवृत्ती, आठवी एनएमएमएस परीक्षेसंबंधी शिक्षकांसाठी कार्यशाळाजरगनगरातील प्री-प्रायमरी स्कूलमध्ये गुरुपौर्णिमाकोल्हापूर जिल्हा शंभर टक्के साक्षर बनविण्यासाठी प्लॅनिंग-जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

जाहिरात

 

दुरावलेल्या नगरसेवकांच्या घरवापसीसाठी राष्ट्रवादीची फिल्डींग ! भैय्या माने, युवराज पाटलांच्यावर जबाबदारी !!

schedule17 Jun 25 person by visibility 489 categoryराजकीय

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : महापालिका निवडणूक ताकतीने लढविण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षांनी केला आहे. सक्षम उमेदवार निवडायचे आणि निवडणूक जिंकायची ही निती आखण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षापासून दुरावलेल्या माजी नगरसेवकांना पुन्हा एकदा सामावून घेण्यात येणार आहे. नगरसेवकांच्या या घरवापसीची जबाबदारी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैय्या माने, गोकुळचे संचालक युवराज पाटील यांच्यावर सोपविली आहे. त्यांच्या सोबतीला, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, माजी नगरसेवक महेश सावंत, उत्तम कोराणे असणार आहेत. नजीकच्या काळात जवळपास दहा माजी नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत परतणार असल्याचे वृत्त आहे.

साधारणपणे दिवाळीनंतर महापालिका निवडणुका होण्याचे संकेत मिळत आहेत. त्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. आढावा बैठक घेऊन अंदाज घेतला जात आहे. शिवसेनेने तर माजी नगरसेवकांच्या इनकमिंगवर भर दिला आहे. भाजपानेही पदाधिकारी व नगरसेवकांच्या बैठका घेतल्या आहेत. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही महापालिका निवडणुकीसाठी सरसावला आहे.  माजी नगरसेवकांच्या लागोपाठ दोन बैठका झाल्या. मंत्री व जिल्हयाचे नेते हसन मुश्रीफ यांनी महायुती म्हणून साऱ्यांनी एकत्र लढायचे आहे. महायुतीच्या नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय ठेवा अशा सूचना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच राष्ट्रवादीतील कोणी अन्य पक्षाची वाट चोखाळू नये यासाठी खबरदारी घ्या, विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही असेही बजावले आहे.

 महायुतीतर्फे निवडणूक लढताना राष्ट्रवादीही सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे. अशा सक्षम उमेदवारांचा शोध राष्ट्रवादी घेत आहे. पूर्वी जे पक्षात होते, पण काही कारणास्तव दुरावले आहेत. त्यांना पुन्हा पक्षात सामावून घेण्याला प्राधान्यक्रम असणार आहे. माजी महापौर सुनिता राऊत, माजी उपमहापौर प्रकाश पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती सचिन पाटील, माजी नगरसेवक विनायक फाळके हे पूर्वी राष्ट्रवादीशी निगडीत होते. यांच्याशी संपर्क साधला जाणार आहे. भैय्या माने व युवराज पाटील यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे.  याशिवाय महापालिकेत सत्तेत असताना मित्र पक्ष असलेल्या व राष्ट्रवादीशी जवळीक असलेल्या नगरसेवकांवरही जाळे टाकण्यात येणार आहे. माजी नगरसेविका तेजस्विनी घोरपडे यांचे पती नागेश घोरपडे हे राष्ट्रवादीत सक्रिय झाले आहेत. माजी नगरसेवक संभाजी जाधव, महेश कदम, अजित मोरे यांना राष्ट्रवादीत आणता येईल का ? याविषयी त्यांची मते जाणून घ्यावीत असेही बैठकीत ठरले. अन्य नगरसेवक व सक्षम उमेदवारांचा शोध घेण्याचे काम राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, महेश सावंत, उत्तम कोराणे हे  पाहणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes