+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule23 Apr 24 person by visibility 33 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
हमीदवाडा साखर कारखाना कर्नाटकातल्या व्यक्तीला विकल्याचा धडधडीत १०० टक्के खोटा आरोप विरोधकांकडून केला आहे. राजकारणासाठी किती बदनामी आणि अपप्रचार करणार आहात ? असा संतप्त सवाल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. 
महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या  प्रचारार्थ कागल येथील खर्डेकर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी मंत्री मुश्रीफ बोलत होते. ते म्हणाले, ‘अशा प्रकारच्या १०० टक्के खोट्या बातम्या पेरून मुद्दामहून शाहू महाराजांच्या विरोधात विधाने करावीत, असा तर हेतू नाही ना ? त्यामुळे  शाहू महाराजांची प्रतिमा डागाळली जाईल अशी कोणतीही कृती करू नका.’
 जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, माजी नगरसेवक चंद्रकांत गवळी, अतुल जोशी, नामदेवराव पाटील, नवल बोते, ॲड. संग्राम गुरव, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, बाबासो नाईक, सतीश घाटगे, सागर गुरव, संजय फराकटे, शशिकांत नाईक, संग्राम लाड, अजित निंबाळकर, इरफान मुजावर, पंकज खलिफ, महेश मगर, विक्रम जाधव, सुनील कदम, गंगाराम शेवडे, संदीप भुरले, बाबासो पखाली, अशोक वड्ड, नवल बोते, सुनील माळी, अर्जुन नाईक, रणजीत बन्ने, विवेक लोटे, बच्चन कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते. प्रवीण काळबर यांनी स्वागत केले.  माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत गवळी यांनी आभार मानले.