+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule23 Apr 24 person by visibility 404 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी, २७ एप्रिल रोजी कोल्हापुरात सभा होत आहे. तपोवन मैदान येथे सायंकाळी पाच वाजता सभा होणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
या सभेसाठी मुख्यम्ंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह केंद्र व राज्य सरकारमधील मंत्री उपस्थित राहणार आहेत. मोदी यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने कोल्हापुरात महायुतीचे भगवे वादळ घोंगावणार असल्याचे क्षीरसागर यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांचा कोल्हापूर दौरा २८ एप्रिलला होता. त्यामध्ये आता बदल झाला आहे. मोदी हे २७ एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. तपोवन मैदान येथे त्यांची सभा होणार आहे.
 लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू असून, राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील ज्या लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे, अशा मतदारसंघात आता लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर जिल्हयातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात पार पडणार असून, कोल्हापूर लोकसभा महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार मंडलिक व माने यांच्या प्रचारासाठी मोदी यांची सभा होणार आहे. मोदी यांच्या सभेमुळे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उत्साह संचारला आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी महायुतीकडून तयारी सुरू झाली आहे.