+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule23 Apr 24 person by visibility 52 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर आणि सिरी एज्युटेक, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी २८ एप्रिल रोजी फार्मसी विद्यार्थ्यांसाठी ‘मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह’ चे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पस ड्राईव्हमध्ये १० नामांकित कंपन्यांचा सहभाग असून फार्मसी मधील पदवी, पदविका व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. 
    या “मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह “ मध्ये विद्यार्थ्यांच्या पात्रतेनुसार विविध परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये ॲप्टीट्यूड टेस्ट, ग्रुप डिस्कशन समावेश आहे. यातुन उत्तम गुण प्राप्त करून निवड झालेले विद्यार्थी अंतिम फेरी म्हणजेच पर्सनल इंटरव्ह्यूला सामोरे जातील.
      डी. वाय. पाटील फार्मसी कॉलेजची स्थापना दोन वर्षापूर्वी झाली. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत सर्वांगीण विकास व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील आहे. अन्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनाही या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.   
 २८ रोजी डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, कदमवाडी ऑडिटोरीयम हॉल, सकाळी ८.३० वा. ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह होणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासठी विद्यार्थ्यांनी https : // tinyurl. com/5h7sjskz या लिंकवर नोंदणी करावी असे आवाहन प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांनी केले आहे.