+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustराजेश क्षीरसागरांच्या विजयासाठी जीवाचे रान करू -भाजपा पदाधिकाऱ्यांची ग्वाही adjustजिल्हा परिषद कृषी विभागातील तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या adjustदीपावलीनिमित्त जिल्हा परिषदेला चार दिवस सुट्टी adjustडीवाय पाटील अभियांत्रिकीत एनपीटीईएल जागरूकता कार्यशाळा adjustविधानसभेसाठी काँग्रेसचे 40 स्टार प्रचारक, सतेज पाटलांचा समावेश adjustबंडखोरीची भाषा करणारे वीरेंंद्र मंडलिक उतरले मुश्रीफांच्या प्रचारात, म्हणाले विजयासाठी जीवाचे रान करू adjustचंद्रदीप नरकेंचे शक्तीप्रदर्शन, जंगी रॅलीने उमेदवारी अर्ज दाखल adjustकोल्हापुरात मनसेचे अनोख्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल adjustशाहू महाराजांनी सांगावं, माझं काय चुकलं ? राजेश लाटकर adjustराजेश लाटकर आमचा कार्यकर्ता, ते आमच्या सोबतच असतील ! उद्या त्यांची भेट घेणार !!
1001157259
1001130166
1000995296
schedule18 Jul 24 person by visibility 260 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आणि संघटना तयारी करत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने निवडणूूक जिंकण्यासाठी आतापासूनच रणनिती आखत आहेत. दरम्यान विधानसभेच्या या निवडणुकीत लहानसहान पक्ष, विविध संघटना, सामाजिक संस्था यांना सोबत घेऊन महायुती आणि महाविकासला पर्याय म्हणून परिवर्तन आघाडी करण्याचा निर्धार करण्यात आला. यासंबंधी संघटना पदाधिकारी व नेते मंडळीची बैठक झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी परिवर्तन आघाडीसाठी पुढाकार घेतला आहे.
 पुणे येथे झालेल्या बैठकीत,    राज्यातील विविध शेतकरी प्रश्नासह होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर इतर सर्व संघटना व छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घेऊन परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून लढा उभारण्याचा निर्णय झाला. पुण्यातील  नवीन शासकीय विश्रामग्रह येथे झालेल्या या बैठकीला राज्यातील शेतकरी चळवळीतील मुख्य प्रवाहातील शेतकरी संघटनाच्या ज्येष्ठ नेत्यांची संयुक्त बैठक
   यावेळी परिवर्तन आघाडीच्यावतीने बेरोजगारी , वाढत्या शेतकरी आत्महत्या , सातत्याने पडत चाललेले शेतमालाचे दर ,कर्जाच्या बोजाखाली दबलेला शेतकरी , केंद्र सरकारचे चुकीचे आयात व निर्यात धोरण, दिवाळ खोरीच्या उंबरठ्यावर असलेली राज्याची आर्थिक स्थिती यासंबंधी चर्चा झाली. महायुती आणि महाविकासला पर्याय देण्यासाठी राज्यातील सामाजिक , आर्थिक , शैक्षणिक , व आरोग्य विषयक क्षेत्रामध्ये काम करणा-या सामाजिक संघटना यांना सोबत घेऊन  परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून एक सक्षम पर्याय देण्यावर शिक्कामोर्तब केले. या बैठकीस माजी आमदार वामनराव चटप , माजीं खासदार राजू शेट्टी , शंकर आण्णा धोंडगे, अनिल घनवट, ललित बहाळ, डॅा. महावीर अक्कोळे , योगेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
  परिवर्तन आघाडीतर्फे राज्यातील विविध संघटना व छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घेऊन २८८ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. ३० जुलै रोजी औरंगाबाद येथे जागावाटप व पुढील धोरणाबाबत बैठक होणार आहे.