+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule09 Apr 24 person by visibility 106 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महाविकास आघाडीने कोल्हापुरातील जागा जाहीर केल्या. शिवसेना ठाकरे गट २१ जागा लढविणार आहे. काँग्रेस सतरा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला दहा जागा मिळाल्या. बहुचर्चित सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरे गट लढविणार आहे. भिवंडीचा मतदारसंघ शरद पवार गट लढणार आहे.
महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील जागा वाटप जाहीर केले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जयंत पाटील, खासदार संजय राऊत, शेकापचे जयंत पाटील उपस्थित होते. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, डावे पक्ष आदी सहभागी आहेत.
शिवसेना ठाकरे गटाला मिळालेल्या २१ जागांमध्ये जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजी नगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशीम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण आणि मुंबई ईशान्य समावेश आहे. काँग्रेस सतरा जागा लढणार आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि मुंबई उत्तर मतदारसंघाचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट दहा जागा लढवित आहे. यामध्ये बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड मतदारसंघाचा समावेश आहे.