+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ?
Screenshot_20240226_195247~2
schedule27 May 23 person by visibility 142 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटना(केडीएलटीए) यांच्या वतीने व डी वाय पाटील पुरस्कृत १८ व्या रमेश देसाई स्मॄती १६ वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या अर्णव पापरकर व मुलींच्या गटात कर्नाटकच्या साई जान्वी टी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले. 
केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स, कोल्हापूर येथे सूरू असलेल्या या स्पर्धेत विजेतेपदाच्या लढतीत पात्रता फेरीतून आलेल्या महाराष्ट्राच्या बिगर मानांकीत अर्णव पापरकरने दोन तास चाललेल्या सामन्यात आपल्या राज्य सहकारी चौथ्या मानांकीत समर्थ सहिताला 2-6, 6-3, 6-2 असा पराभवाचा धक्का देत विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात कर्नाटकच्या बिगर मानांकीत साई जान्वी टी हीने तेलंगणाच्या नवव्या मानांकीत ऋषिता बसिरेड्डीचा 7-5, 6-2 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
दुहेरीत विजेतेपदाच्या लढतीत मुलांच्या गटात दिल्लीच्या प्रणील शर्मा व हरयाणाच्या आदित्य मोर या जोडीने कर्नाटकच्या आराध्या क्षितिज व श्रीनिकेत कन्नन यांचा 6-3, 6-4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या नैनिका बेंद्रम व सेजल भुतडा या दुस-या मानांकीत जोडीने आपल्या राज्यसहकारी आकृती सोनकुसरे व ऐश्वर्या जाधव या अव्वल मानांकीत जोडीला 6-3, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभवाचा धक्का देत विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेतील एकेरी व दुहेरीच्या विजेत्या व उप विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण  संजय डी. पाटील, एमएसएलटीएचे आजीव अध्यक्ष शरद कन्नमवार, एआयटीए चे सहसचिव व एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, एमएसएलटीएचे सहसचिव शितल भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री व स्पर्धा सुपरवायझर वैशाली शेकटकर, स्पर्धा चेअरमन दिलीप मोहिते, केडीएलटीएचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश कित्तुर, केडीएलटीएचे सदस्य मुरलीधर घाटगे, केडीएलटीएचे मानद सचिव मेघन बागवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(अंतिम फेरी): 
मुले: अर्णव पापरकर(महाराष्ट्र) वि.वि समर्थ सहिता(महाराष्ट्र)(4)2-6, 6-3, 6-2
मुली: साई जान्वी टी(कर्नाटक) वि.वि ऋषिता बसिरेड्डी(तेलंगणा)(9) 7-5, 6-2
दुहेरी गट अंतिम फेरी: 
मुले:प्रणील शर्मा(दिल्ली)/आदित्य मोर(हरयाणा) वि.वि आराध्या क्षितिज(कर्नाटक)/श्रीनिकेत कन्नन(कर्नाटक)6-3, 6-4
मुली: नैनिका बेंद्रम(महाराष्ट्र)/सेजल भुतडा(महाराष्ट्र)(2) वि.वि आकृती सोनकुसरे(महाराष्ट्र)/ ऐश्वर्या जाधव(महाराष्ट्र)(1) 6-3, 6-4