+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule23 Apr 24 person by visibility 62 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कडकडणार्‍या हलगी-घुमक्याचा स्फुल्लिंग चेतविणारा ताल, शाहू छत्रपतींच्या जयजयकाराचा अखंड घोष आणि नागरिकांचा उदंड सहभाग अशा त्रिवेणी संगमात मधुरिमाराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वाखाली शिवाजी पेठेतील विविध भागातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल निर्माण केला. दोन लाखांच्या मताधिक्क्याने शाहू छत्रपती यांचा विजय होईल, असा आत्मविश्‍वास मधुरिमाराजे यांनी यावेळी व्यक्‍त केला.
शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यान, खंडोबा देवालय परिसरात सायंकाळी धडाकेबाज प्रचार रॅलीने सारा परिसर पिंजून काढला. 
महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ मधुरिमाराजे छत्रपती यांनी पद्माराजे उद्यान परिसरात सायंकाळी सभा घेतली. खंडोबा देवालय येथे झालेल्या सभेला कोल्हापूर उत्तरच्या आमदार श्रीमती जयश्री जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना आ. श्रीमती जाधव यांनी शाहू छत्रपती यांच्यासारख्या अभ्यासू आणि कणखर नेतृत्वाची कोल्हापूर व पर्यायाने देशाला गरज असून त्यांच्या माध्यमातून कोल्हापूरच्या विकासाला आणखी चालना मिळेल, असा विश्‍वास व्यक्‍त केला. 
मधुरिमाराजे छत्रपती म्हणाल्या, शाहू छत्रपती हे समाजातील प्रत्येक घटकांशी निगडित आहेत. कला, क्रीडा, सांस्कृतिक सामाजिक अशा विविध क्षेत्राला त्यांनी प्रोत्साहित केले आहे. असंख्य खेळाडूंना मदतीचा हातभार दिला आहे. कलाकारांना चालना दिली. कोरोना सारख्या आपत्तीच्या काळात नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरविल्या. समाजातील गरजू घटकांना जमिनी मोफत दिल्या. कोल्हापूरच्या प्रगतीचा त्यांना ध्यास आहे. कोल्हापूरच्या विकासासाठी त्यांच्यासारखे व्यापक विचारांचे नेतृत्व संसदेत पोहोचायला हवे.
माजी उपमहापौर विक्रम जरग यांनी प्रास्ताविक केले. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कॉर्नर सभा झाल्यानंतर उत्साही वातावरणात रॅलीला सुरुवात झाली. जय जवान तरुण मंडळ, मॅरीड अँड अन्मॅरीड ग्रुप, विठ्ठलाई तरुण मंडळ, बुवा चौक अशा भागातून रॅली मार्गस्थ झाली. मधुरिमाराजे छत्रपती यांनी नागरिकांशी संवाद साधत, महिलांशी हितगुज करत शाहू छत्रपती यांना मतदान करण्याचे आवाहन केले. या भागातील प्रत्येक गल्ली पिंजून काढत त्यांनी मतदारांशी संपर्क साधला.
रॅलीमध्ये माजी उपमहापौर जरग, आर डी पाटील, जयवंतराव चव्हाण, भगवानराव पोवार, चंद्रकांत सूर्यवंशी, पंडित पोवार किसनराव पाटील, श्रीकांत मोहिते, प्रल्हाद पवार, पद्मजा तिवले, रवी दुधवाडकर, मंजीत माने, निलेश साळोखे, अक्षय जरग, विक्रम मोरे, महेश निकम, भरत जाधव, भीमराव बोडके त्यांच्यासह नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.
विठ्ठलाई तरुण मंडळ येथे मधुरिमाराजे छत्रपती यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी सरिता सासने यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर त्यांनी सचिन सरनाईक यांच्या घरी भेट दिली. रॅली सासने गल्ली मार्गे पुढे मार्गस्थ झाली. शिवदत्त रेसिडेन्सी येथे मधुरिमाराजे छत्रपती यांनी मतदारांशी संवाद साधला. याप्रसंगी उपमहापौर जरग, गजानन नागवेकर, सुरेश पाटील, आनंद जरग, रमेश पाटील हे व्यासपीठावर होते. वेताळमाळ परिसरातील नागरिकांशी थेट संपर्क साधत शाहू छत्रपती यांना मतदान करण्याचे आवाहन मधुरिमाराजे छत्रपती यांनी केले.