+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustहातकणंगले गटशिक्षणाधिकारीपदी रवींद्रनाथ चौगुले adjustघोडावत विद्यापीठात एम फार्म कोर्स सुरू adjustवारणा विद्यापीठ - टेलर्स युनिव्हर्सिटी मलेशिया यांच्यामध्ये सामंजस्य करार adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात - समीर देशपांडे adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री
1001130166
1000995296
schedule21 Sep 24 person by visibility 170 categoryगुन्हे
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनोमस) अभियांत्रिकी महाविद्यालयाने आष्टा येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय महिला बास्केटबाँल स्पर्धत विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरीगचा पराभव करीत विजेतेपद मिळविले. तसेच पूर्वा भोसले हिला बेस्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. संघामध्ये पुर्वा भोसले, मनस्वी मोरे, निर्झरा पाटील जाधव, श्रावणी भोसले, अनन्या संदे, वृषाली निकम, वैष्णवी अडनाईक, श्रेया जाधव, प्रेरणा पाटील, कृष्णाली पाटील, आर्या पाटील, सम्राज्ञी पाटील या खेळाडूंचा समावेश होता. 
या खेळाडूना श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे, अध्यक्ष आमदार विनयर कोरे, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे, मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे, तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. डी. एन. माने यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच क्रीडा प्रशिक्षक  उदय पाटील व सागर चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.