+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustआपली उमेदवारी फाइनल, शिवसेनेतर्फे २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार-राजेश क्षीरसागर adjustजीएसटी अधिकाऱ्याला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले adjustउत्तम संवाद कौशल्य म्हणजे उत्तम करिअरची संधी- डॉ विश्वनाथ मगदूम adjustजिल्ह्यातील हॉटेल, बार, दारु दुकाने रात्री अकरानंतर बंद ! जिल्हा प्रशासनाचा आदेश adjustप्रत्येक निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमध्ये मतदानाचा चढता आलेख ! नवीन २६ मतदान केंद्रे !! adjustइचलकरंजी भाजपा कार्यालयात आवाडेंचे उत्साही स्वागत ! शशिकला जोल्ले, सुरेश हाळवणकरांनी केले स्वागत !! adjustजिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे आढावा बैठक adjustकरवीर तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेतर्फे सभासदांना दीपावली भेट वस्तू वाटप adjustकोल्हापूर दक्षिणची जनता माझ्यासोबत ! निवडणुकीत नक्की पाठीशी राहील !! अमल महाडिक adjustजनसुराज्य जिल्ह्यात तीन जागा लढणार, उमेदवारही निश्चित
1001157259
1001130166
1000995296
schedule24 Jun 24 person by visibility 665 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करुन सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून सन्मानित करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून २०२२-२३ (कामकाज वर्ष २०२१-२२) व २०२३-२४ (कामकाज वर्ष २०२२-२३) या वर्षाचे पुरस्कार जाहीर केले.
आदर्श ग्रामसेवक पुरस्कार २०२२-२३ (कामकाज वर्ष २०२१-२२) पुढीलप्रमाणे, कंसात ग्रामपंचायतीचे नाव : ग्रामसेवक अशोक भास्कर सानप (हाळोली), अभिजीत बाबूराव सावंत (हेदवडे), प्रकाश सदाशिव मडव (गुडवळे खालसा), परशुराम पांडूरंग रावण (तनवडी), बाजीराव भिमराव देसाई (कोदे) तर बाळू विलास कांबळे (चंदूर), अविनाश बाळाप्पा वाघे(बाळेघोल) व संजय कृष्णा चौगुले (रणदेवीवाडी) यांना विभागून पुरस्कार जाहीर झाला. करवीर व मुख्यालय अंतर्गत लक्ष्मण कृष्णात पाचगावे (ग्रामपंचायत विभाग) व दिलीप दिनकर गोसावी (हिरवडे दुमाला) यांना विभागून पुरस्कार आहे.. विद्या विकास जाधव (गोलिवडे), निवासी श्रीपती आवाड (शेळेवाडी), रुपाली सागर मस्के (बजागेवाडी), उमेश सुधाकर रेळेकर (तेरवाड) यांना पुरस्कार जाहीर झाले.
२०२३-२४ (कामकाज वर्ष २०२२-२३) पुरस्कार पुढीलप्रमाणे, कंसात ग्रामपंचायतीचे नाव : संतोष अर्जुन कुंभार (कोवाडे), प्रदीप साताप्पा काटकर (सोनारवाडी-राणेवाडी), अशोक लक्ष्मण शेळेक (हलकर्णी), भिवाजी कृष्णात बचाटे (अणदूर), अनुपमा धनपाल सिदनाळे (निलेवाडी), मंगल संदीप कुंभार (चौंडाळ) यांना पुरस्कार आहेत. करवीर व मुख्यालय अंतर्गत सचिन बाळासो शिरदवाडे (ग्रामपंचायत विभाग), प्रवीण मारुती खाराळकर (हिरवडे दुमाला)यांना विभागून पुरस्कार मिळाला. भाऊसो मोहन निळकंठ (मरळी), निवृत्ती सिताराम पाटील (ठिकपुर्ली), काळू रामू बागुल (दानोळी) यांना पुरस्कार जाहीर झाले. शाहूवाडी तालुक्यातील प्रविणकुमार कृष्णा पोवार (पेरीड), जालिंदर राजाराम भोसले (ऐनवाडी-धनगरवाडी) यांना पुरस्कार विभागून आहे.