कोल्हापूर फुटबॉल संघाचा यवतमाळ संघावर दहा गोलनी विजय
schedule26 May 23 person by visibility 453 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
शिरपूर (धुळे) येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आज शुक्रवारी झालेल्या सामन्यात कोल्हापूर जिल्ह्याने यवतमाळ संघाचा १०-० अशा फरकाने धुव्वा उडवला.
कोल्हापूर संघाचा सामना यवतमाळ संघाबरोबर झाला. कोल्हापूर संघाने या सामन्यात अखेरपर्यंत आक्रमक खेळ करत वर्चस्व ठेवले. कोल्हापूर संघाच्या गंधर्व डाकेने 12, 23,26 व 28 या मिनिटाला गोल केले तर हर्षवर्धन इंजरने 56 व्या मिनिटाला गोल केला, ईशान तिवलेने 30 व 60 मिनिटांना गोल केले तर ईशान हिरेमठ याने पेनल्टीवर 41 व्या मिनिटाला गोल केला.
उद्या कोल्हापूर संघाचा सामना नंदुरबार या संघाबरोबर होणार आहे. संघाचे मार्गदर्शक संतोष पवार व व्यवस्थापक म्हणून म्हणून अमित शिंत्रे यांनी उत्कृष्ट कामकाज पाहिले