+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule22 Apr 24 person by visibility 73 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार धैर्यशील माने यानी पन्हाळा तालुक्यातील कोडोली भागात केलेल्या संपर्क दौऱ्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या दौऱ्यात खासदार माने यांचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्त्यांनी सर्व ठिकाणी जोरदार स्वागत झाल्याने जनसुराज्य शक्ती पक्ष सक्रीय झाल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
 तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील, सुरेश पाटील तसेच रणजीत पाटील,अर्बन बँकेचे चेअरमन राहुल पाटील, माजी जि. प. सदस्य बी. टी. साळुंखे, यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. जयंत पाटील,कोडोली अर्बन बँकेचे चेअरमन राहुल पाटील, कोडोली चे माजी सरपंच शंकर पाटील,नितीन कापरे, माजी उप सरपंच मानसिंग पाटील तसेच माजी सरपंच कै.विद्यानंद पाटील यांचे घरी भेटी दिल्या.
खासदार धैर्यशील माने,आमदार विनय कोरे यांनी कोडोली येथील प्रवीण शेट्टी यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी उपस्थित जिल्हा सचिव ओमकार चौगुले,उपजिल्हाप्रमुख संतोष जाधव,जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते ॲड. राजेंद्र पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय बजागे,उदयसिंह पाटील,कोडोलीचे उपसरपंच प्रविण जाधव भाजपाचे सचिव अविनाश चरणकर उपस्थित होते
 यावेळी खासदार माने यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत  विकास कामाची माहिती दिली. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते ॲड राजेंद्र पाटील याच्यासह भाजपा - शिवसेनेच्या कार्यकर्त्या होते.