+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule04 Apr 24 person by visibility 238 categoryक्रीडा
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राजमुंद्री (आंध्रप्रदेश) येथे २५ ते २८ मार्च दरम्यान झालेल्या २५ व्या सब- ज्युनिअर राष्ट्रीय फेन्सिंग (तलवारबाजी) स्पर्धेत जिजाऊ जीवन पाटील हिने ( मु पो. आसगांव)  वैयक्तिक फॅाईल प्रकारात सुवर्ण पदक आणि टीम फॅाईल मध्ये ब्रॅाझ पदकाचा मान मिळविला.
 जिजाऊ पाटीलने १४ वर्षाखालील गटात हे पदक मिळवले आहे. उपांत्यपूर्व लढतीत बिहारची राज केसरला १५:६ असे हरविले आणि अंतिम सामन्यांत चंदीगढच्या चामोली रूबीला १५:९ ने जिंकून महाराष्ट्राचे नाव सुवर्ण पदावर कोरले.
जानेवारी मध्ये झालेल्या शालेय क्रिडा स्पर्धेत ही रौप्य पदक जिंकले होते.
आता पर्यंत ४ राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन ६ राष्ट्रीय पदकांना गवसणी घातली आहे…तसेच २०२२ रोजी थांयलॅड येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे.फेन्सिंग खेळ प्रकारात सर्वात्तम कामगिरी करत महाराष्ट्राचे शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
   जिजाऊ ही आसगाव (ता.पन्हाळा) या गावाची आहे. अक्षरनंदन पुणे या मराठी शाळेची विद्यार्थ्यांनी आहे.एन गार्ड फेन्सिंग ॲकॅडमी बालेवाडी येथे महाराष्ट्र राज्याचा खेळातील सर्वाच्च शिवछत्रपती पुरस्कार विजेती आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू श्वेता चंडालीया,मणिपूरचे बोमाय, तामिळनाडूचे शंकरा यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करते.तिला भारतीय तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे प्रोत्साहन लाभले आहे. या यशामध्ये तिला आजोबा,  जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पी डी पाटील (आसगावकर), वडील जीवन पाटील, आई मनीषा पाटील यांनी प्रोत्साहित  केले.