+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust.लोहिया हायस्कूलची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत धडक adjust कुलगुरू डॉ.के.प्रथापन यांचा अवॉर्ड ऑफ ऑनरने गौरव adjustराजाराम कारखान्याच्या वार्षिक सभेत सर्व प्रश्नांची उत्तरे देणार - अमल महाडिक adjustकोल्हापुरात निघणार २५ हजार शिक्षक-कर्मचाऱ्यांचा मोर्चा! आंदोलनात पालकांचाह सहभाग !! adjust पर्यटन व्हिलेज स्पर्धेत पाटगावला राष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक adjustचांदेकरवाडीच्या कुस्ती मैदानात सुभाष निऊंगरेचा प्रेक्षणीय विजय adjustशेतकरी संघ बचावासाठी धडक मोर्चा ! पालकमंत्री- जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध !! adjust चेतन नरकेंची मलेशियातील ग्लोबल सीएफओ समिटमध्ये निवड adjustसासूबाई जोरातमध्ये उलगडणार सासू-जावयाची धमाल गोष्ट adjustवीरशैव बँकेला चार कोटी ७१ लाखाचा नफा, सभासदांना दहा टक्के लाभांश
Screenshot_20230905_091804~2
Screenshot_20230903_122011~2
schedule25 Mar 23 person by visibility 279 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज 1 :
‘इन्फ्लुएन्झा H3 N2 या विषाणूंनं डोकं वर काढलं असून इन्फ्लुएंझा (H3N2)ची लागण झालेले रुग्ण महाराष्ट्रातही आढळून येत आहेत. तथापि सकस आहार, पुरेशी झोप, गर्दीत जाणे टाळणे, मास्कचा वापर त्याचबरोबर आजाराची लक्षणे आढळून आल्यावर वेळीच उपचार घेतल्यास इन्फ्लुएन्झा आजारातून लवकर बरे होता येते. म्हणूनच इन्फ्लुएन्झा आजाराला ‘घाबरु नका..पण खबरदारी घ्या..!’ असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केले आहे. 
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. योगेश साळे यांच्याशी माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी साधलेल्या संवादमधील काही भाग.
इन्फ्लुएन्झा आजार आणि त्याची लक्षणे कोणती ?
इन्फ्ल्यूएंझा आजार विषाणुमुळे होणारा आजार आहे. इन्फ्ल्यूएंझाचे टाईप A B आणि C असे प्रकार आहेत. इन्फ्ल्यूएंझा टाईप ए चे उपप्रकार H1 N1, H2N2,H3 N2 असे आहेत. यात ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे, न्युमोनिया अशी लक्षणे आढळतात. यावर प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. सर्दी, ताप, खोकला होताच जवळच्या सरकारी किंवा खाजगी दवाखान्यात त्वरित तपासणी करुन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत.
…………………..
इन्फ्ल्यूएंझा होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी ?
 - सर्वांनी वारंवार साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुवावेत. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्यावी तसेच भरपूर पाणी प्यावे. खोकला असल्यास मास्क किंवा तीन पदर करुन हातरुमाल वापरावा. आजारी व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.
…………………..
आरोग्य विभागाच्या वतीने तयारी- आरोग्य विभागाच्या वतीने पुरेसा औषधसाठा व वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. रुग्णाच्या सहवासात आल्यापासून दहा दिवसात फ्ल्यू सारखी काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा. सर्दी, खोकला अंगावर काढु नका. त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरु केलेल्या उपचारासोबतच गरम पाण्याची वाफ घ्यावी, आदी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. इन्फ्ल्यूएंझा टाळण्याकरता हस्तांदोलन टाळावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषध घेऊ नये. लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. विशेषत: वृध्द व दुर्धर आजारी लोकांनी गर्दीत जाणे टाळावे.
……………………..
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहार ?
- रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यास कोणताही आजार उद्भवण्याचा धोका कमी राहतो. यासाठी आपण सर्वांनी नेहमी पौष्टिक आहार घ्यायला हवा. आहारात लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या आरोग्यदायी पदार्थांचा वापर करावा. नाचणीसारख्या पौष्टिक तृणधान्यांचा आहारात समावेश करावा. प्रक्रिया केलेले तसेच बेकरी पदार्थ, फास्टफूड खाणे टाळावे.