Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अपक्ष उमेदवार संग्राम भालकरांचा सभासद  संपर्कावर भरश्री रवळनाथ को - ऑप हौसिंग फायनान्सच्या कोल्हापूर शाखेचा सोमवारी वर्धापनदिन, शंभर कोटी ठेवीबद्दल आनंद सोहळाअखिल भारतीय महापौर परिषदेच्या कार्यकारिणीवर महापौर रुपाराणी निकम यांची नियुक्तीपालकमंत्री लक्ष देणार का ? सहा महिने पगार थकीत… जिल्हा परिषदेतील जलजीवनमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाली कोण !महापालिकेत महायुतीत मानापमान नाट्य, कार्यालय प्रवेश कार्यक्रमापासून शिवसेना नगरसेवक चार हात लांबसभागृह नेता, स्थायी समिती सभापतींचा कार्यालयीन प्रवेशईएसआय रुग्णालय - ओपीडीमधील समस्या तातडीने सोडवा : कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनची मागणीकोरे अभियांत्रिकीत सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांची विविध कंपन्यात निवडप्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावू या : अध्यक्षा शिल्पा खोत कलाकार - कामगारांचे स्वप्नं साकारण्यासाठी…वडिलांची ईच्छा पूर्ण करण्यासाठी महामंडळाच्या निवडणुकीत - संग्राम भालकर

जाहिरात

 

अपक्ष उमेदवार संग्राम भालकरांचा सभासद  संपर्कावर भर

schedule06 Jun 26 person by visibility 32 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार संग्राम भालकर यांनी सभासद मतदारांच्या संपर्कावर भर दिला आहे. सभासदांच्या भेटी घेऊन निवडणूक लढविण्यामागील भूमिका मांडत आहेत. या निवडणुकीत त्यांचे चिन्ह फुलपाखरू आहे. नृत्य दिग्दर्शक विभागातून त्यांची उमेदवारी आहे.‘आपुलकीचे विश्वासाचे आपले एक मत, महामंडळाच्या यश किर्तीचे’अशी साद ते सभासदांना घालत आहेत. चित्रपट कामगारांना संघटित करुन त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक, सिनेमा नाट्य व नृत्य क्षेत्रातील ज्येष्ट कलावंतांचा परिसंवाद, कला मेळावा घेणे, वृदध कलावंतांच्या मानधन योजनेसाठी पाठपुरावा आणि चित्रीकरण वाढविण्यासाठी वेगवेगळया संकल्पना घेऊन ते मतदारांना भेटत आहेत. भालकर कुटुंबीयांची यांची चौथी पिढी सिनेसृष्टीत कार्यरत आहे. चित्रपट दिग्दर्शक व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष यशवंत भालकर यांचे ते चिरंजीव आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes