Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवराज्याभिषेक दिन सोहळयानिमित्त मराठा महासंघातर्फे मिरवणूकनवीन राजवाडयात शिवराज्याभिषेक दिन सोहळा थाटामाटातबिंदू चौकात ‘शिवाजी कोण होता ?’ पुस्तकाचे सामूहिक वाचनजिल्हा परिषदेत शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात, स्वराज्यगुढी उभारून शिवरायांना मुजराअपक्ष उमेदवार संग्राम भालकरांचा सभासद  संपर्कावर भरश्री रवळनाथ को - ऑप हौसिंग फायनान्सच्या कोल्हापूर शाखेचा सोमवारी वर्धापनदिन, शंभर कोटी ठेवीबद्दल आनंद सोहळाअखिल भारतीय महापौर परिषदेच्या कार्यकारिणीवर महापौर रुपाराणी निकम यांची नियुक्तीपालकमंत्री लक्ष देणार का ? सहा महिने पगार थकीत… जिल्हा परिषदेतील जलजीवनमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाली कोण !महापालिकेत महायुतीत मानापमान नाट्य, कार्यालय प्रवेश कार्यक्रमापासून शिवसेना नगरसेवक चार हात लांबसभागृह नेता, स्थायी समिती सभापतींचा कार्यालयीन प्रवेश

जाहिरात

 

जिल्हा परिषदेत शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात, स्वराज्यगुढी उभारून शिवरायांना मुजरा

schedule07 Jun 26 person by visibility 30 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेसमोरील ऐतिहासिक कागलकर हाऊस येथे “शिवशक राजदंड स्वराज्यगुढी” उभारून शिवरायांना मानाचा मुजरा करण्यात आला.

आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर, शिक्षण समिती सभापती शितल यादव,  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली.  कार्यक्रमात “फोक जागर शिवसोहळा” तसेच “सार्थक बाल भारती” यांच्यावतीने विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

शिवचरित्रावर आधारित पोवाडे, गीत, नृत्य आणि शिवकालीन प्रसंगांच्या प्रभावी सादरीकरणाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. शिवरायांच्या शौर्य, पराक्रम, न्यायप्रियता आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे मांडण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद कलामंचच्या कलाकारांनी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करून कार्यक्रमास देशभक्तीपूर्ण वातावरण प्राप्त करून दिले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes