+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule13 Mar 24 person by visibility 112 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने खंडोबा तालीम मंडळाचा टायब्रेकरमध्ये ४-३असा पराभव करत सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पूर्ण वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत होता. पाटाकडील तालीम मंडळाने स्पर्धेचे आयोजन केले आहे.
पूर्ण वेळेत दोन्ही संघांनी गोल नोंदवण्याचे जोरदार प्रयत्न केले. पण अचूक समन्वयअभावी गोल करण्यात दोन्ही संघांना अपयश आले. सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर मुख्य पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला त्यामध्ये फुलेवाडी संघाने बाजी मारली. फुलेवाडी कडून निरंजन कामते, रेहान मुजावर, विराज साळोखे, ऋतुराज संकपाळने गोल केले तर खंडोबा कडून संकेत मेढे आदित्य लायकर, प्रभू पोवार यांनी गोल नोंदवण्यात यश मिळवले. श्रीकांत परब याची पेनल्टी गोलरक्षक आशिष गवळी याने रोखली तर ओमकार लायकर याची पेनल्टी बदली गोलरक्षक रणवीर खालकर याने रोखली .फुलेवाडीने हा सामना ४-३अशा फरकाने जिंकला. या सामन्यात फुलेवाडीचा गोलरक्षक आशिष गवळी याची सामनावीर तर खंडोबाचा पृथ्वीराज साळोखे याची लढवय्या खेळाडू म्हणून निवड झाली.
 गुरुवारचा सामना, 
शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ दुपारी चार वाजता.