गारगोटीत गुलमोहर आर्ट गॅलरी, २५ सप्टेंबरला उद्घाटन
schedule22 Sep 22 person by visibility 287 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
भुदरगड राधानगरी-आजरा या दुर्गम भागामध्ये पहिली आर्ट गॅलरी सुरू होत असून त्याचे उद्घाटन येत्या २५ सप्टेंबरला केडी देसाई कॉलनीमधील सभागृहात सकाळी अकरा वाजता होत आहे. या गॅलरीचे उद्घाटन प्रा. प्रेमिला भोसले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कोल्हापूरचे अनेक नामवंत चित्रकार यावेळी उपस्थित राहणार आहेत. भुदरगड तालुका संघाचे अध्यक्ष प्रा. बाळ देसाई हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. दरम्यान बालचित्रकारांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याचा बक्षीस वितरण समारंभ याप्रसंगी होणार आहे. या गॅलरीमध्ये आबालाल रहमान, गणपतराव वडणगेकर, ,विश्रांत पवार, सज्जन रामाणे, जयसिंगराव दळवी, अरविंद मिस्त्री अशा नामवंत चित्रकारांची दुर्मिळ चित्रे पाहायला मिळतील.
कोल्हापूर जिल्ह्यातील चित्रकार शिल्पकार, चित्रकलेची, विद्यार्थी कलाशिक्षकांनी उद्घाटन सोहळयाला उपस्थित राहावे अशी खात्री आहे असे आवाहन गॅलरीचे संचालक डॉ. सुभाष देसाई यांनी केले आहे.