करुन दाखविलं, ड्रेनेजचा प्रश्न सोडविला ! प्रभागात बगिचे, महिलासाठी विरंगुळा केंद्रे ! !
schedule04 Jan 26 person by visibility 42 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राजकारण आणि समाजात काम करत असताना काही जण हे प्रत्यक्ष कामावर भर देतात. त्यापैकीच एक धडाडीचे कार्यकर्ते म्हणजे, दुर्वास कदम. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून प्रभागात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी केली. त्या विकासकामांच्या बळावर आणि जनसंपर्काच्या जोरावर दुर्वास कदम हे जानेवारी २०२५ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १९ मधील उमेदवार आहेत. काँग्रेसच्या हात चिन्हावर ते निवडणूक लढवित आहेत.
गेली अनेक वर्षे ते राजकारण व समाजकारणात सक्रिय आहेत. धडपडणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. आमदार सतेज पाटील यांचे ते विश्वासू सहकारी आहेत. महापालिकेच्या २०१५ मधील निवडणुकीत कळंबा फिल्टर हाऊस प्रभागातून त्यांच्या पत्नी वृषाली कदम या निवडून आल्या. पक्षाने त्यांच्याकडे महिला व बालकल्याण समिती सभापतिपदाची जबाबदारी सोपविली. नगरसेविका व महिला बालकल्याण समिती सभापती म्हणून लक्षात राहण्याजोगी कामे केली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हॉस्पिटल व पंचगंगा हॉस्पिटलमधील वैद्यकीय सुविधासाठी निधी उपलब्ध करुन दिला.
आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून दुर्वास कदम यांनी तब्बल सात कोटी रुपयांचा निधी प्रभागातील विकासकामासाठी आणला. प्रभागातील अनेक भागाात ड्रेनेजचा विषय प्रलंबित होता. तीस वर्षापासून हा प्रश्न भेडसावत होता. हा प्रश्न मार्गी लावला. प्रभागातील पायाभूत सुविधांच्या सोयींना प्राधान्यक्रम दिले. महिलांसाठी विरंगुळा केंद्र तयार केले. रस्ते गटर्स, चॅनेल, पिण्याचे पाण्याचे पाइपलाइन, गॅसलाइन पूर्ण केले. जेवढे ओपन स्पेस आहेत, ते संपूर्ण खुल्या जागा सुरक्षित केल्या. त्या ठिकाणी बगिचे तयार केले. ताराराणी कॉलनीत ११० घरांचा प्रश्न मार्गी लावला. कदम हे, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. नेतेमंडळींच्या माध्यमातून उपलब्ध विकास निधीतून भागात मोठया प्रमाणात काम केली. जनसंपर्क ठेवून लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक केली. प्रभागात लहान लहान बगिचे तयार केले आहेत.
प्रभाग क्रमांक १९ मधून ते निवडणूक लढवित आहेत. चार सदस्यीय प्रभाग रचना असल्यामुळे लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. निवडणूक लढविण्यामागील भूमिका मांडत आहेत. प्रभागाच्या विविध विकास योजना प्रस्तावित केल्या आहेत. नागरिकांनी काँग्रेसला मतदान करुन निवडून द्यावे, प्रभागाची वेगळी ओळख निर्माण करू असा विश्वास मतदारांना देत आहेत. त्यांच्या प्रचारफेऱ्यांना मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे.