+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule23 Apr 24 person by visibility 118 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :"जोतिबाच्या नावानं चांगभल...!" च्या जयघोषात श्री क्षेत्र जोतिबा यात्रा भाविकांच्या अमाप उत्साहात पार पडली. गुलालांनी जोतिबा डोंगर न्हावून निघाला.
 महाराष्ट्रासह, आंध्रप्रदेश, गोवा, कर्नाटक आदी राज्यांतून लाखोंच्या संख्येने भाविक या यात्रेत उंच सासनकाठ्या नाचवत सहभागी झाले. या सर्व भाविकांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जोतिबा यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पूजा पार पडल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी श्री जोतिबाचे दर्शन घेऊन मानाच्या सासन काठ्यांचे पूजन केले.
  श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील श्रीजोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष येडगे यांनी श्री जोतिबाचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी त्यांच्या हस्ते पाडळी निनाम (ता.सातारा) येथील मानाच्या सासन काठीचे पुजन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत निवडणूक निरीक्षक रोहित सिंह, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, शाहुवाडी-पन्हाळा प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे आदी उपस्थित होते.
दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या यात्रेचा मंगळवार हा मुख्य दिवस. यात्रेसाठी लाखो भाविक दाखल झाले. एसटी, बैलगाडी, खाजगी वाहनातून तसेच पायी चालत भाविक जोतिबा डोंगरावर पोहोचले. जोतिबा मंदिरात पहाटे पासून धार्मिक विधी सोहळ्यास प्रारंभ झाला. शाहुवाडी-पन्हाळा प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या हस्ते पहाटे पाच वाजता शासकीय महाभिषेक झाला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे उपस्थित होते. सकाळी १० वाजता धुपारती सोहळा झाला. दुपारी १२ ते १ या कालावधीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या सासनकाठीच्या पुजनाने मिरवणुकीस प्रारंभ झाला. चांगभलंच्या गजरात सासनकाठयांंची मिरवणूक काढण्यात आली.
......................
“कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती व्हावी, संपूर्ण महाराष्ट्राची प्रगती व्हावी, अशी प्रार्थना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दख्खनच्या राजाच्या चरणी केली. श्रीजोतिबा देवस्थान हे कोल्हापुरसह संपूर्ण महाराष्ट्राचे प्रमुख देवस्थान आहे. लाखो भाविक या यात्रेनिमित्त येत असून सर्वांसाठी प्रशासनामार्फत आवश्यक सुविधा देण्यात येत आहेत. सर्व भाविक नियमांचे पालन करीत असून त्यांनी चांगल्या प्रकारे यात्रा पार पाडावी.”
-अमोल येडगे, जिल्हाधिकारी कोल्हापूर