+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !!
Screenshot_20240226_195247~2
schedule06 Mar 24 person by visibility 105 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज् वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
जळगाव येथे सुरू असलेल्या आंतरजिल्हा सब ज्युनिअर गर्ल्स चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत कोल्हापूरने पालघर संघाचा ७-२ अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात धनश्री पाटील व समिक्षा चौगुले यांनी हॅटट्रीक साधली.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने (विफा) स्पर्धेचे आयोजन केले आहे.
  कोल्हापूर संघाने पालघर संघाचा ७-२ असा पराभव केला. सामन्यात कोल्हापूरच्या धनश्री पाटील हिने चौथ्या, ४२ आणि ४८ व्या मिनीटाला सलग तीन गोल्ससह हॅट्रीक साधली. तर समिक्षा चौगुले हिने १४, २४ आणि २७ व्या मिनीटाला सलग तीन गोल्स केले. युगंधरा पाटीलने ३५ व्या मिनीटाला एका गोलची नोंद केली. कोल्हापूरच्या संघाला प्रशिक्षक अमित शिंत्रे व सहाय्यक प्रशिक्षक सानिका पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. गुरुवारी ७ रोजी कोल्हापूरचा उपांत्य सामना नागपूर संघाविरोधात होणार आहे