+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule12 Mar 24 person by visibility 120 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
  आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून भागीरथी महिला संस्था, युवती मंच आणि भाजपतर्फे मिस अँड मिसेस भागीरथी सौंदर्य स्पर्धा अपूर्व उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत गायत्री जांभेकर मिस भागीरथी, तर प्रफुल्ला बिडकर मिसेस भागीरथी पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मुकुट आणि बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
“सौंदर्य क्षेत्रात महिलांना मोठ्या संधी आहेत. भागीरथी महिला संस्थेमार्फत घेतलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून इथल्या तरूणी भविष्यात राज्य-राष्ट्रीय पातळीवरील सौंदर्य स्पर्धेत चमकदार कामगिरी करतील,”असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. 
शाहू स्मारक भवनमध्ये भागीरथी कला आणि क्रीडा सांस्कृतिक मंचच्या कार्याचा शुभारंभ आणि स्पर्धेचे उद्घाटन  मंगल महाडिक, वैष्णवी महाडिक, साधना महाडिक, क्रिना महाडिक, डॉ. सिमीन बावडेकर, कल्पना सावंत, अनुराधा पित्रे यांच्या हस्ते झाले.  गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. नीलम पाटील, अनुष्का भोसले, प्रिया सूर्यवंशी यांनी नृत्याविष्कार सादर केला. शिवश्री बावडेकरने कोळीगीते सादर केली. नेचर फॅशन वर आधारीत मिस भागीरथीची पहिली फेरी झाली. गायत्री फालेने लावणी नृत्य सादर केले. प्रसिद्ध निवेदक-गायक प्रल्हाद पाटील यांनी स्पॉट गेमच्या माध्यमातून कार्यक्रमात रंगत आणली. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. संगीता सूर्यवंशी, शितल पाटील, अश्विनी कदम, रूपाराणी निकम यांनी लक्षवेधी उखाणा घेतला. यानंतर मिसेस भागीरथी स्पर्धेची पहिली फेरी झाली. सई पाटील, मीनाक्षी भंगे, अमृता देसाई, साक्षी पाटील, स्वाती पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज थीम सादर केली.
मिस भागीरथी आणि मिसेस भागिरथी स्पर्धेची दुसरी फेरी पार पडली. दरम्यान गायक प्रल्हाद पाटील आणि स्नेहलता सातपुते यांनी एकाहून एक सरस गीते सादर केली. साहिल भारती यांनी विविध नृत्याविष्कार सादर केले. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते स्पॉट गेम मधील विजेत्या महिलांना बक्षीसं देण्यात आली.  मिस भागीरथी बेस्ट पर्सनॅलिटीचा पुरस्कार मयुरी कांबळे, मिस भागीरथी बेस्ट कॉस्च्युमचा हेमांगी पांड्या, आणि तृतीय क्रमांक मृणाल पाटील यांना देण्यात आला. विजेत्या युवतींना मंगलताई महाडिक यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली. मिस भागिरथी उपविजेत्या पूजा बिडकर यांचा सौ अरुंधती महाडिक यांच्या हस्ते, तर प्रथम विजेत्या गायत्री जांभेकर यांचा खासदार धनंजय महाडिक, सौ. अरुंधती महाडिक आणि मंगलताई महाडिक यांच्या हस्ते सन्मान झाला. मिसेस भागीरथी बेस्ट पर्सनॅलिटी म्हणून मोनाली घाडगे, बेस्ट क्रिएटिव्हिटीचा रूपाली रेडेकर, बेस्ट कॉस्च्यूमचा गीता भोसले, बेस्ट टॅलेंटसाठी गायत्री फाले, आणि बेस्ट स्माईलचा पुरस्कार नयना शहा यांना देण्यात आला. विजेत्यांना नितीन अग्रवाल, सिमिन बावडेकर, साहिल भारती, कल्पना सावंत, सुशील अग्रवाल, गौरी शिरोडकर, आरती तपकिरे, अनुराधा पित्रे, दुर्गा पोतदार, कृष्णा महाडिक यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेतील तृतीय विजेत्या गीता भोसले, उपविजेत्या गीता काटे ठरल्या.  प्रतिभा जाधव यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे नियोजन शिवानी पाटील, सीमा भोसले, शरयू भोसले, शितल तिरुके, मृदुला शिंगणापूरकर यांनी केले.