Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळमध्ये महायुतीचा दोन हजाराहून अधिक मतांनी विजय, ठरावधारकांनी सहलीवर जायची तयारी ठेवावी - हसन मुश्रीफछछ दद‘टाइम टू मार्केट’ साधणाराच खरा उद्योजक, ग्रीन हायड्रोजनमध्ये मोठी संधी : कुलगुरू डॉ. राजनीश कामतराजू शेट्टी हे स्टंटबाज आंदोलक, सतेज पाटलांनी माझ्या मंत्रीपदाची काळजी करू नये - आमदार राजेश क्षीरसागरमहाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे धरणे आंदोलनजिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीरशक्तीपीठ महामार्गावरुन राजू शेट्टी -राजेश क्षीरसागर समर्थक भिडले रस्त्यावरविज्ञानाच्या जगाची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूती, शहीद पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची रिसर्च सेंटरला भेटशिक्षणाधिकारी मीना शेंडकरांच्याकडून सात प्रकरणात कर्तव्यात कसूर, पदस्थापनेत प्रशासकीय अनियमितता ! चौकशी अहवालात ठपका ! !शिक्षणाधिकारी मीना शेंडकरांना कारणे दाखवा नोटीस, खुलासा करण्यास सात दिवसाचा अवधी

जाहिरात

 

जिल्हा परिषदेत गणेशोत्सव साजरा करणार, पदाधिकारी- सदस्यांच्या बैठकीत निर्णय

schedule03 Sep 26 person by visibility 169 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेत गेल्या २२ वर्षापासून गणेशोत्सव साजरा होतो. त्यानुसार यंदाही जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील पहिल्या मजल्यावर गणरायाची प्रतिष्ठापना व उत्सव साजरा करण्याचे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्यांच्या बैठकीत ठरले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जिल्हा परिषदेत गणेशोत्सव साजरा होण्यासंबंधी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांना भेटू असेही सदस्य म्हणाले.

सरकारी कार्यालयात उत्सव साजरे होऊ नयेत यासंबंधीचे निवेदन संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांना दिले. त्या निवेदनानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने उत्सव साजरे करण्यास मनाई केली. जिल्हा परिषद कलामंचतर्फे गेल्या २२ वर्षापासून गणरायाची प्रतिष्ठाना करण्यात येते. यंदा, प्रशासनाच्या निर्णयामुळे कलामंचनेही माघार घेतली.दरम्यान हा विषय जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांना समजला. यासंबंधी गुरुवारी ३ सप्टेंबर २०२६ रोजी अध्यक्षा खोत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत पदाधिकारी व सदस्यांची बैठक झाली.  समाजकल्याण समिती सभापती श्रद्धा गायकवाड, महिला व बालकल्याण समिती सभापती विद्या विलास पाटील, शिक्षण समिती सभापती शीतल प्रवीण यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा परिषद सदस्य शिवाजी जाधव म्हणाले, ‘जिल्हा परिषेदत गेल्या २२ वर्षापासून गणरायाची प्रतिष्ठापना होते. त्यामध्ये खंड पडू द्यायचे नाही. गणेश वंदना, उत्सव साजरा करण्यात चुकीचे काही नाही. गणराय साऱ्यांचे आराध्य दैवत आहे. याविषयी सीईओंना भेटू. सकारात्मक निर्णय घेऊ. जर प्रशासनाने रितसर मान्यता दिली नाही तर सीईओंच्या कार्यालयाला टाळे ठोकू. ’ काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील म्हणाले,‘  कोणत्याही परिस्थितीमध्ये गणरायची प्रतिष्ठापना होणार आहे. उत्सवाबाबत चुकीचा निर्णय होत असेल तर खपवून घेणार नाही. सीईओना भेटू या. मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यत उत्सव साजरा होतो. तेव्हा जिल्हा परिषदेत उतसव साजरा करण्यास कोणी विरोध करू नये. शिवसेनेचे गटनेते व सदस्य अरुण जाधव म्हणाले, ‘जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्य कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत. मंत्रालयात उत्सव साजरे करतात. जिल्हा परिषदेतही गणेश उत्सव साजरा होण्यास कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. हा विषय, पालकमंत्री प्रकाश आबिकटर यांच्या कानावर घातला आहे. त्यांनीही उत्साहात उत्सव साजरा करावा असे सांगितले आहे. सारे जण उपस्थित राहू या.’ सदस्य अभिजीत तायशेटे, राजेंद्र सुर्यवंशी यांनीही गणेश उत्सव साजरा करण्यासंबंधी भूमिका मांडली. या बैठकीला सदस्य प्रशांत शहापुरे, सलीम महात, अतिश शिंगे, महेश पाटील, अर्चना निकम, संयोगिता मोरे, अर्चना चौगले, नंदिनी कांबळे, यशवंत नांदेकर आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes