+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule20 Apr 24 person by visibility 75 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : श्री. अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट घोटवडे आणि श्री संत बाळूमामा देवालय आदमापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळचे चेअरमन  अरुण गणपतराव डोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षी अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर मोफत  सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या वर्षी श्री संत बाळूमामा देवालय आदमापूर येथे शुक्रवारी १० मे २०२४ रोजी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे.  विवाह इच्छूक तरुण-तरुणी किंवा त्यांच्या पालकांनी लग्नाची नोंदणी या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये करावी असे आवाहन ट्रस्टचे उपाध्यक्ष अभिषेक डोंगळे यांनी केले. 
 या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये नोंदणी करणाऱ्या दांपत्याला श्री अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्टकडून वधू-वरासाठी मणी मंगळसूत्र, लग्नाचा पेहरावा, संसार उपयोगी भांड्यांचा सेट, विनामूल्य विवाह मंडप, हारतुरे, भटजी, अक्षता, वऱ्हाडी मंडळीसाठी मोफत भोजन व्यवस्था याच बरोबर वधूपित्यास सरकारचे अनुदान मिळवून देण्यासाठी विशेष सहकार्य ट्रस्टच्या माध्यमातून केले जाणार आहे.या विवाह सोहळ्यामध्ये नोंदणी करून विवाह झाल्यास राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून वधुपित्यास  २५,००० रुपये इतके अनुदान दिले जाते. सामाजिक न्याय (समाज कल्याण) विभागाकडून मागासवर्गीय वधूपित्यास २०,००० रुपये इतके अनुदान दिले जाते. जास्तीत जास्त वधू-वरांनी या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये नोंदणी करून सहभागी व्हावे असे आवाहन श्री अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट घोटवडे यांच्या वतीने करण्यात येत आहे. विवाहासाठी नाव नोंदणी ५ मे २०२४ पर्यंत करणे आवश्यक आहे. विवाह नोंदणीसाठी पुढील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. सुहास डोंगळे- ९८२२९७६६६६, धनाजी पाटील -९४२३२८०१७१, पवन गुरव – ९६९९७०१०४०, उत्तम पाटील – ९६६५८९६६६६, देवबा पाटील – ७७९८८६३३३२.