कोल्हापूर सर्जिकल सोसायटीतर्फे चार दिवसीय परिषद
schedule03 Feb 25 person by visibility 178 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर सर्जिकल सोसायटीतर्फे सहा ते नऊ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत मॅसिकॉन शल्यविशारद परिषद होत आहे. या परिषदेमध्ये बाराशेहून अधिक शल्यविशारद व एमएस अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या परिषदेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि नवीन पद्धती दाखविण्यात येणार आहेत अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ. दीपक पाटील, परिषदचे सचिव डॉ. आनंद कामत व संयोजक डॉ. प्रताप वरुटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हॉटेल सयाजी येथे ही परिषद होत आहे. कोल्हापूर सर्जिकल सोसायटीला आठ वेळा महाराष्ट्र राज्य आणि दोन वेळा देशपातळीवर बेस्ट सोसायटी म्हणून बहुमान मिळाला आहे. सहा फेब्रुवारीला निरंतर अभ्यास (सीएमई) सकाळी ९ ते ५ या वेळेत होणार आहे. या दिवशी थायरॉईड, मधुमेह, मुतखडा व नवनवीन शोध या विषयावर सर्जन बोलणार आहेत. त्यामध्ये डॉ. मिलीद रूके - मधुमेह, थायरॉईडवर डॉ. निता बायर मार्गदर्शन करतील. यादिनी दुपारी बारा वाजता निरंतर अभ्यासचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्र राज्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजय पुणपाळे यांच्या हस्ते उद्घाटन व डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल विद्यापीठाचे कुलगुरू आर. के. मुदगल यां उपस्थितीत होणार आहे.
सात फेब्रुवारी रोजी विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया दाखवून त्यातील नवनवीन पद्धती सांगण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ. मायदेव, अंतरंग हॉस्पिटलचे डॉ. विवेकानंद कुलकर्णी हे इंडोस्कोपीक सर्जरी, दुर्बिणीव्दारे हर्णिया, जठराच्या, पित्ताशयाच्या व स्थूलपणवरच्या शस्त्रक्रिया दाखवण्यात येतील. यादिवशी सायंकाळी सहा वाजता या परिषदेचे उद्घाटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. प्रविण सुर्यवंशी यांच्या हस्ते व डॉ. संतोष अब्राहम, डॉ. संजय पाटील कुलपती डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संतोष अब्राहम तसेच महाराष्ट्र राज्य शल्यचिकित्सक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अजय पुणपाळे, सचिव डॉ. सचिन नाईक यांची प्रमुख उपस्थिती असेल.
आठ फेब्रुवारीला डॉ. प्रविण सुर्यवंशी,डॉ. सिध्देश, मैसूर, डॉ. भवरलाल यादव, जयपूर, डॉ. अभय दळवी यांचे चर्चासत्र आहे. ९ फेब्रुवारी रोजी विविध विषयावरील व्याख्याने होणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने डॉ. पार्थसारथी, डॉ. रेघे, डॉ. पोरवाल डॉ. पल्लीवेलू हे सहभागी होणार आहेत.पत्रकार परिषदेला सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. वैभव मुधाळे, डॉ. बसवराज कडलगे, डॉ. कौस्तुभ कुलकर्णी, डॉ. सौरभ गांधी, डॉ. मानसिंग अडनाईक, खजानीस डॉ. मधूर जोशी, डॉ. सागर कुरूणकर, डॉ. देवेंद्र होशिंग , डॉ अनिकेत पाटील उपस्थित होते.