वीरशैव बँकेला चार कोटी ७१ लाखाचा नफा, सभासदांना दहा टक्के लाभांश
schedule27 Sep 23 person by visibility 298 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री वीरशैव को ऑपरेटिव्ह बँकेला आर्थिक वर्षात चार कोटी ७१ लाख रुपयांचा नफा झाला आहे. बँकेतर्फे सभासदांना दहा टक्के लाभांश देण्यात येणार आहे.’असे बँकेचे अध्यक्ष अनिल स्वामी यांनी जाहीर केले.
वीरशैव को ऑपरेटिव्ह बँकेची ८२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत अध्यक्ष स्वामी यांनी बँकेच्या प्रगतीचा आलेख मांडला. अध्यक्ष स्वामी म्हणाले, ‘बँकेच्या ठेवी एक हजार ६८ कोटी आहेत. कर्ज वाटप ७२० कोटी रुपयांचे आहे. तसेच गुंतवणूक ३४५ कोटी रुपयांची आहे. बँकेचा एकूण व्यवसाय दोन हजार कोटी रुपयांचा आहे. बँकेने शून्य टक्के एनपीए राखला आहे.’
बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक अविनाश खोत यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. राजेंद्र कोरे यांनी इतिवृत्ताचे वाचन केले. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त् केले. याप्रसंगी बँकेचे संचालक गणपतराव पाटील, गजानन सुलतानपुरे, सदानंद हत्तरकी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव झाला.
याप्रसंगी बँकेचे संचालक नानासाहेब नष्टे, बाबा देसाई, राजेश पाटील चंदूरकर, सुर्यकांत पाटील बुद्धिहाळकर, चंद्रकांत स्वामी, डॉ. दिलीप चौगले, शंकुतला बनछोडे, राजेंद्र शेटे, अनिल सोलापुरे, रंजना तवटे, चंद्रकांत सांगावकर, डॉ. सतीश घाळी, वैभव सावर्डेकर, राजेंद्र माळी, आप्पासाहेब आर्वे, सीए सिद्धार्थ मजती, व्यवस्थापन मंडळ सदस्य प्रकाश दत्तवाडे, अरविंद माने, राजशेखर येरटे, सुकुमार पाटील बुद्धिहाळकर, सरला पाटील, बाळा पाटील आदी उपस्थित होते. अतुल माळी यांनी सूत्रसंचालन केले.