+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule21 Apr 24 person by visibility 351 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
फ्रान्स येथे १० ते १२ जून दरम्यान जागतिक आंतरविद्यापीठ रग्बी स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापिठाचे ४ महिला खेळाडू आणि १ पुरुष खेळाडूची निवड करण्यात आली आहे. कल्याणी कृष्णाथ पाटील,  वैष्णवी दत्तात्रय पाटील , साक्षी धनाजी कुंभार (सर्व न्यू कॉलेज, कोल्हापूर) आकांशा आनंद कातकडे आणि  हार्दिक राजेभोसले (एल बी एस कॉलेज सातारा) या सर्वांची अभिनंदनीय निवड भारतीय विठ्यापीठ रग्बी संघामधे केला आहे. 
शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय विद्यापीठाच्या एका सांघिक क्रिडा प्रकारमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता शिवाजी विद्यापीठाचे ४ खेळाडूंचा समावेश झाला आहे. हे खूप अभिनंदनीय आणि कौतुकास्पद बाब ठरली आहे. याचबरोबर कु.शुभांगी बाळू गावडे आणि कु. स्वाती जयाप्पा माळी यांचीही राखीव क्रं १ आणि २ वरती निवड करण्यात आली आहे. अखिलभारतीय आंतरविद्यापीठ आणि खेलो इंडिया या स्पर्धेमधे शिवाजी विद्यापीठाच्या महिला व पुरुष संघाने अतिशय उल्लेखनीय कामगिरी बजावून शिवाजी विद्यापीठाचे वर्चस्व अग्रक्रमांकावर कायम ठेवले आहे. सर्व यशस्वी खेळाडूंना विद्यापीठाचे सम्माननीय कुलगुरू प्रा.डॉ.डी टी शिर्के , प्र कुलगुरू ,प्रा.डॉ. पी एस पाटील , सर्व सन्माननीय व्यवस्थापन परिषद सदस्य कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे , संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण प्रा.डॉ. शरद बनसोडे, यांनी शुभेच्या दिल्या .जिल्हा संघटना अध्यक्ष  अमर सासणे,  दिपक पाटील, संग्रामसिंह मोरे, अर्जुन पिटुक, राहुल  लहाने यांचे मार्गदर्शन लाभले.