तरुण कलाकारांची आर्थिक फसवणूक, युवा सेनेची पोलिस प्रशासनाकडे तक्रार
schedule06 Apr 23 person by visibility 722 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : सिनेमात काम देतो असे सांगून तरुण कलाकारांचीं आर्थिफ फसवणूक होत आहे. तरुण कलाकरांची फसगत करणाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी या मागणीचे निवदेन शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेतर्फे जिल्हा पोलिस प्रशासनाला देण्यात आले. ताहिर कुरणे यांच्या विरोधात हे निवेदन दिले आहे. कलाकार, तंत्रज्ञांना फसवाल तर गाठ आमच्याशी आहे असा इशाराही युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.पोलिस अधिकारी तानाजी सावंत यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, “ताहिर कुरणे हे अनेक वर्षे तरुणांना सिनेमात काम देतो,मोठ्या एन्व्हेंटमध्ये पैसे मिळवून देतो. असे सांगून अनेक लोकांना फसवणूक करत असल्याच्या तक्रारी आहेत.,नुकतेच त्याने कोल्हापुरातील दहा ते बारा तरुण-तरुणींना मोठया कंपनीच्या इव्हेंटमध्ये काम देऊन रोज हजारप्रमाणे पैसे देतो अशी खोटे आमिष दाखवून एक महिना काम करून घेतले मात्र पैसे दिले नाहीत असे तक्रारीत म्हटले आहे.
शिष्टमंडळात युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने, वैभव जाधव, सानिका दामूगडे, अवदेश करबे, माधुरी जाधव,रोहित वढे, सुनील कानूरकर, अनिकेत ठोंबरे, रघु भावे, कीर्तीकुमार जाधव,प्रिया माने, युवराज मोरे,चैतन्य देशपांडे, प्रतीक भोसले आदींचा समावेश होता.