Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वेताळमाळ तालीम मंडळ ठरला सतेज चषकाचा मानकरी ! दिलबहार तालीम मंडळाला उपविजेतेपद !!णण तततढढ तय नवीन आलेल्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची कार्यपद्धती अवलंबणे गरजेचे, निष्ठेला योग्य न्याय मिळतोजिल्हा परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरीकोल्हापुरात पंधरा एप्रिलपासून तीन दिवसीय बसव व्याख्यानमालाविविध उपक्रमानी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी कंपनी सचिव म्हणून प्रशासनासह खासगी कंपन्यातही करिअरच्या मोठया संधी - पवन चांडककेआयटीच्या आदित्य साळुंखेस २७ लाख ५० हजाराचे पॅकेज ! बेट्टी ब्लॉक्स आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड !!  काँग्रेसमध्ये घराणेशाहीला ब्रेक ! पदाधिकारी बदलात नव्या चेहऱ्यांना संधी !!

जाहिरात

 

प्रा. विनय पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सतरा एप्रिलला सत्कार सोहळा, गौरव ग्रंथाचे प्रकाशन

schedule13 Apr 26 person by visibility 211 categoryशैक्षणिक

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित महाराष्ट्र हायस्कूल व जुनियर कॉलेजमधील किमान कौशल्य व्यवसायिक अभ्यासक्रम विभागाचे प्रमुख प्रा. विनय गजानन पाटील हे 36 वर्षाच्या सेवेनंतर 31 मे 2026 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. आतापर्यंत केलेल्या कार्याचा गौरव म्हणून येत्या 17 एप्रिल रोजी प्रा. विनय पाटील यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे. या समारंभात त्यांच्या वाटचालीवर आधारित गौरव ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे अशी माहिती गौरव समितीचे अध्यक्ष डॉ बी. एम. हिरडेकर व कार्याध्यक्ष प्रा. सी. एम गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली
17 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी साडेचार वाजता अमृतसिद्धी सांस्कृतिक भवन कळंबा येथे सेवानिवृत्ती सोहळा आयोजित केला आहे. आमदार जयंत आसगावकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय पुणे येथील सेवानिवृत्त सहसंचालक चंद्रकांत निनाळे व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे  हे प्रमुख पाहुणे तर माजी आमदार मालोजीराजे छत्रपती हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असतील. याप्रसंगी हुतात्मा शिक्षणा उद्योग समूहाचे प्रमुख वैभव नायकवडी, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष बी.जी. बोराडे संस्थेचे चेअरमन डॉ. के.जी पाटील यांची विशेष उपस्थिती असणार आहे. डॉ. हिरडेकर म्हणाले, " प्रा. पाटील हे 1990 पासून महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या किमान कौशल्य व्यवसायिक अभ्यासक्रमाकडे ऑटो इंजिनिअरिंग विभागात प्राध्यापक  आहेत. श विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून ते परिचित आहेत.  शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कृषी व क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यांच्या वाटचालीवर आधारित "विनय" या गौरव ग्रंथाचे प्रकाशन याप्रसंगी करण्यात येईल. प्राचार्य जी. पी. माळी व प्राचार्य  प्रवीण चौगले हे या गौरव ग्रंथाचे संपादक आहेत. या ग्रंथात 100 हून अधिक मान्यवरांचे लेख आहेत.350 हून अधिक  पानांचा हा ग्रंथ आहे."
पत्रकार परिषदेला प्राचार्य माळी, डॉ. ए. ए. कलगोंड, प्रा. अर्चना जगतकर, प्रा. श्रीराम परांजपे, प्रा. एस आर पाटील, प्रा. मनीषा नायकवडी, आझाद नायकवडी, युवराज कदम आदी उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes