+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule22 Apr 24 person by visibility 79 categoryशैक्षणिक
हायड्रोजन इंधन हेच भविष्य: बाला थयागराजन
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
भविष्यात येणाऱ्या ऊर्जेचा तुटवण्यासाठी हायड्रोजन इंधन हाच भविष्यातील उपाय असेल असे स्पष्ट मत केपजेमिनी इन्फॉर्मेशन सायन्स बेंगलोरचे उपाध्यक्ष श्री बाला थयागराजनयांनी व्यक्त केले. 
तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनोमस) अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील युरेका जिज्ञासा २के २४ कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षापासूनच अभियांत्रिकी शाखेतील सारखे दुवे शोधून आंतरविद्याशाखीय संशोधन करावे असा सल्ला त्यांनी दिला. तसेच आत्ताच्या काळातील कृत्रिम बुद्धिमत्ता ही परिपूर्ण नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
 वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही.व्ही. कारजिन्री यांनी अध्यक्षीय भाषणात नोकरी शोधण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा असा मौलिक सल्ला दिला. युरेका जिज्ञासा स्पर्धेसाठी साठी महाराष्ट्र कर्नाटक गुजरात एनआयटी अशा नामांकित संस्थांमधून १००० हुन अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांना दोन लाखाहून अधिक रकमेची बक्षिसे मिळणार आहेत.
 स्पर्धेच्या नियोजनासाठी वारणा विविध उद्योग शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. एस. व्ही. आणेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. डीन, एस. एम. पिसे उपस्थित होते. समन्वयक प्रा. आर. बी. पाटील यांनी आभार मानले. डॉ. एन. एस. धाराशिवकर, प्रा. एस. एच. मोरे, प्रा. विशाल सनदे, सुमय मगदूम, विघ्नेश गुरव, अनिकेत शिंदे यांनी परिश्रम घेतले. डॉ. मार्क मोनीस, श्रेयस श्रीराम, तन्वी पाटील, प्रीती धेटे यांनी सूत्रसंचालन केले.