+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule27 Sep 22 person by visibility 277 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेचे (कोजिमाशि)संस्थापक व पहिले सभापती शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील व संस्थेच्या मुख्य प्रवर्तक सुशिलादेवी कुलकर्णी यांच्या तैलचित्राचे अनावरण नुकतेच झाले.
 ‘कोजिमाशि’च्या ५२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तैलचित्राचे अनावरण झाले. या समारंभासाठी पाटील कुटुंबीय, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले होते.
मार्केट यार्ड येथील राजर्षी शाहू सभागृह येथे संस्थेची वार्षिक सभा झाली. या सभेअगोदर तैलचित्रांचे अनावरण करण्यात आले. शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी साऱ्यांचे स्वागत केले. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसचे चेअरमन के. जी. पाटील, अध्यक्ष बी.जी.बोराडे, कोजिमाशिचे चेअरमन व डी.बी. पाटील विचार मंचचे उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय घुगरे, विचार मंचचे अध्यक्ष विलास पोवार,कोजिमाशिचे व्हाइस चेअरमन पांडूरंग हळदकर, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसच्या संचालिका सविता पाटील, राजेंद्र डी. पाटील, विनय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा समारंभ झाला. चेअरमन दत्तात्रय घुगरे व सविता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला कोजिमाशिचे संचालक बाळ डेळेकर, राजेंद्र रानमाळे, दीपक पाटील, श्रीकांत पाटील, उत्तम पाटील, सुभाष खामकर, मदन निकम, मनोहर पाटील, शरद तावदारे, राजेंद्र पाटील, अविनाश चौगले, प्रकाश कोकाटे, सचिन शिंदे, राजाराम शिंदे, अनिल चव्हाण, जितेंद्र म्हैशाळे, संचालिका ऋतुजा पाटील, शितल हिरेमठ, शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसचे व्हाइस चेअरमन डी. जी. किल्लेदार,संचालक आर.डी. पाटील, आजीव सेवक सी.एम.गायकवाड, उदय पाटील, महाराष्ट्र हायस्कूलचे प्राचार्य एस. एस. पाटील, विनोद उत्तेकर, समीर घोरपडे, विचारमंचचे आर.वाय.पाटील, दत्ता जाधव, रंगराव तोरस्कर, एस. के. पाटील, जयसिंग पवार आदी उपस्थित होते. कोजिमाशिचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील यांनी आभार मानले.