अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
schedule06 Jul 25 person by visibility 48 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दिव्यांग असलेली व्यक्ती घरात बसलेली शोधून सापडणार नाही. प्रतिकुल परिस्थितीशी झगडत सतत कामात व्यस्त असलेलीच दिसेल.न्युनगंड बाजुला ठेवून विविध क्षेत्रात चमकणारे, प्रसंगी उदबत्ती विक्री करुन चरितार्थ चालविणारे दिव्यांग आणि त्यांचा स्वाभीमान धडधाकट असुनही मनाने खचलेल्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर प्रेस क्लब,कोल्हापूर चे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी केले.
दसरा चौक येथील अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.याप्रसंगी शारिरीक अपंगत्व आणि अपघात होऊन सुद्धा इच्छाशक्तीच्या जोरावर कुस्ती क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविणारे किरण बावडेकर यांच्यासह कृष्णात पाटील अजय वाणकुंद्रे सुहास डोंगरे,राहू गुरव,सदानंद बगाडे अशा विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान दिव्यांग बांधवांनी स्वतः दिव्यांग असून सुद्धा स्वतःचे पुनर्वसन कशाप्रकारे केले.इतरांसाठी कोणत्या प्रकारे मदत करत आहेत, याबाबत मार्गदर्शन करुन, प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याची प्रेरणा दिली. संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र पायमल यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे सेक्रेटरी बापूराव चौगुले यांनी आभार मानले.संस्थेचे विश्वस्त दत्तात्रय महामुलकर,संजय पाटील,विलास मोरस्कर, सुधाकर पाटील,राजू परिते,वसंत कांबळे,प्रदीप शिंदे, प्रल्हाद मोरे,विनोद कोरवी उपस्थित होते.