Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जज डडज्ञानज्योती प्राचार्या शुभांगी गावडेंच्या जयंतीनिमित्त सोळांकूरमध्ये 'न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल' शाखेचे उदघाटन शेतकरी कर्ज आणि वीज बिल माफीमुळे बळीराजा आर्थिक संकटातून बाहेर शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांनी ज्ञानज्योती प्राचार्या शुभांगी गावडे यांची जयंती साजरीजिल्हा परिषद सदस्य एकवटले, अध्यक्षांना दिले निवेदन ! स्थायीच्या सदस्यांचीही साथ !!माझ्याशी वाकडं- नदीवर लाकडं ! आयुक्तांच्या विधानाची नगरसेवकांनी केली मंत्र्यांच्याकडे तक्रार !!मुलांनो , आई-वडिलांची स्वप्ने बना : शिक्षक नेते भरत रसाळेकेएमटी रोजंदारी कर्मचारी कायम होणार, दोन दिवसात आदेश राजेश क्षीरसागरजैन मुला -मुलींसाठी राज्यात सोळा वसतिगृहे उभारणार, कोल्हापुरात प्रशासनाकडे जागेची मागणी -ललित गांधीसोलापूरच्या डेप्युटी सीईओ स्मिता पाटील यांची कोल्हापूरला बदली

जाहिरात

 

शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांनी ज्ञानज्योती प्राचार्या शुभांगी गावडे यांची जयंती साजरी

schedule30 Jul 26 person by visibility 60 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शन, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्याचे वाटप अशा विविध उपक्रमांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या दिवंगत सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांची ५४ वी जयंत साजरी करण्यात आली. विवेकानंद शिक्षण संस्था व कॉलेजतर्फे आयोजित उपक्रमांनी जयंती साजरी केली.

विवेकानंद कॉलेज येथे संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला अभ्यास केंद्र, महिला सक्षमीकरण कक्ष (सचेतना मंडळ), अंतर्गत तक्रार निवारण समिती व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने "ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कारांचा वारसा जपणाऱ्या ज्ञानज्योती प्राचार्या शुभांगी गावडे यांचे कार्य व जीवनप्रवास" या विषयावरील छायाचित्र प्रदर्शन तसेच भारती विद्यापीठाच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य साळुंखे यांयच हस्ते छायाचित्र प्रदर्शन व आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन झाले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, "स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत प्रशासनासोबत ममत्व आणि मातृत्वही प्राचार्य शुभांगी गावडे यांनी पेरले. प्रशासक म्हणून त्यांनी संस्थेला दिशा दिली, तर आईच्या मायेने शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना आपलेसे केले. त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे."

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. श्रद्धा जाधव यांनी उपस्थितांना महिला सक्षमीकरणाची शपथ दिली. ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. शिल्पा भोसले, प्रा. गीतांजली साळुंखे यांनी प्राचार्या शुभांगी गावडे यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. गावडे यांच्या जीवनातील विविध टप्पे, शैक्षणिक, सामाजिक, प्रशासकीय व सेवाभावी कार्याचे दर्शन घडविणारे छायाचित्र प्रदर्शन उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरले. विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर आणि दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने माले येथे ५००  झाडांचे वृक्षारोपण मुरलीधर गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच  राहुल कुंभार, उपसरपंच संतोष खोत, ग्रामपंचायत सदस्य प्रताप  पाटील, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची पतसंस्थेचे चेअरमन हितेंद्र साळुंखे, संस्थेचे कायदेविषयक सल्लागार ॲड. हितेश रानिंगा, प्राचार्य धनराज भोसले, निलेश साळुंखे, महेश साळुंखे, सिद्धेश साळुंखे, प्रा डॉ. अजिंक्य पत्रावळे, डॉ. सुनील भोसले, डॉ. संदीप पाटील, डॉ. प्रदीप पाटील, प्रा. निलेश जाधव आदी उपस्थित होते

कोल्हापुरातील लोकमान्य विद्यालय, मिलिंद हायस्कूल, सरस्वती चुनेकर हायस्कूल, आर.के.वालावलकर हायस्कूल, श्री राम विद्यालय या शाळांमध्ये  संस्थेच्या वतीने गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना  शैक्षणिक साहित्यांचे वाटप संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते झाले. संस्थेच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनि.कॉलेजच्या वतीने साडी वाटप केले. डॉ. सुप्रिया पाटील, प्रा. समीक्षा फराकटे, डॉ. मृणालिनी देसाई यांनी  यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. कविता तिवडे यांनी आभार मानले. तर सूत्रसंचालन केले.  याप्रसंगी वरिष्ठ प्राध्यापक डॉ. सी. बी. पाटील, प्रा. डॉ. एकनाथ आळवेकर, प्रा. मयुरी पाटील, प्रा. पल्लवी देसाई पाटील उपस्थित होते. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes