+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही !
Screenshot_20240226_195247~2
schedule03 Apr 23 person by visibility 1073 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : ग्रो बझ ट्रेडिंग कंपनीतील फसवणूक प्रकरणी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील सहाय्यक लेखाधिकारी शिवाजी बापू कोळी व रजपुतवाडीचे ग्रामसेवक स्वप्निल शिवाजी कोळी (लक्षतीर्थ वसाहत) यांना शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी (3 एप्रिल ) अटक केली. ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून लोकांचे आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारी या कंपनी संदर्भात आहेत. यापूर्वी पोलिसांनी कंपनीशी संबंधित सहा ते सात जणांना अटक केली आहे.
 ग्रोबझ ट्रेडिंग, ग्रोबझ वेल्फेअर आणि ग्रोबझ निधी या तीन कंपन्यात गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देऊ असे आमिष दाखवून गुंतवणूक गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारी या कंपनीच्या संचालकांच्या विरोधात आहेत‌. १४  गुंतवणूकदारांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिले आहेत. कंपनीचे प्रमुख विश्वास निवृत्ती कोळी यांनी जानेवारी २०२१ मध्ये शाहूपुरी चौथी गल्ली येथे कार्यालयाची स्थापना केली. गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखविले. गुंतवणुकीवर दहा पंधरा वीस टक्के व्याज देण्यात येईल असे सांगितले. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एजंटांची नेमणूक केली. एप्रिल 2022 पर्यंत गुंतवणूकदारांना परतावा मिळत होता. मात्र त्यानंतर आर्थिक फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढल्या. गुंतवलेल्या पैशावरील परतावा बंद झाला. गुंतवणूकदारांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दाखल केल्या. संचालकांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले. विश्वास कोळीसह अन्य काही जणांना अटक झाली होती. याप्रकरणी दोघा एजंटानाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
या कंपन्याशी निगडित आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित असल्याच्या कारणावरून सहायक लेखाधिकारी शिवाजी कोळी व ग्रामसेवक स्वप्निल कोळी या दोघांना पोलिसांनी सोमवारी अटक केली. सहायक लेखाधिकारी शिवाजी कोळी हे गेले काही दिवस जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागात कामावर नव्हते अशी माहिती समोर येत आहे.  शाहूपुरी पोलीस स्टेशनकडून या कारवाई संदर्भाचा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनाही कळविला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या संदर्भातील माहिती कळवली आहे
 कलम ४०६, ४०९, ४२०, ३४ सहएमपीआयडीकायदा कलम तीन, चार, सहासह द बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझीट स्कीम्स अॅक्ट २०१९ चे
कलम २१ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्या अंतर्गत शिवाजी कोळी व स्वप्निल कोळी यांना अटक करण्यात आले आहे.