डॉ. प्रकाश संघवी यांना जीवनगौरव पुरस्कार
schedule27 Oct 24 person by visibility 144 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरात गेल्या चार दशकांहून अधिक काळ वैद्यकीय सेवेत कार्यरत प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश संघवी यांना नुकतेच जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नागपूर येथे झालेल्या महापेडीकॉन आय. ए. पी वैद्यकीय परिषदेत डॉ. संघवी यांचा हा सन्मान झाला
महा पेडीकॉन आय.ए.पी या संस्थेतर्फे आयोजित या वैद्यकीय परिषदेला दीड हजार नामवंत डॉक्टर्स उपस्थित होते. या परिषदेत संघवी यांनी आजवर केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. पद्म् पुरस्कार प्राप्त डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. संघवी यांना शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले.
‘आपण निरपेक्ष आणि सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय क्षेत्रात यापुढेही कार्यरत राहून नवजात शिशूंची सेवा करणार आहे. जीवनगौरव पुरस्काराने आपली जबाबदारी आता अधिकच वाढली आहे.’अशा भावना डॉ. संघवी यांनी व्यक्त केल्या.