+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule08 Mar 24 person by visibility 170 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  येथील शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळाने पाटाकडील तालीम मंडळ ब संघांवर ३-१ असा विजय मिळविला, तर शिवाजी तरुण मंडळाने वेताळमाळ तालीम मंडळाचा २-१ असा पराभव केला. पाटाकडील तालीम मंडळाने स्पर्धेचे आयोजन केले आहे.
दिलबहार आणि पाटाकडील ब यांच्यातील सामन्यात ११व्या मिनिटाला सार्थक राऊतच्या पासवर युनुस पठाणने हेडरद्वारे गोल करत पाटाकडील ब संघांने पहिल्या गोलची नोंद केली. परतफेड करण्यासाठी दिलबहारने पाटाकडीलच्या गोलक्षेत्रात खोलवर चढाया केल्या. २३ व्या मिनिटाला निक्सन सॅम्युअलने मैदानी गोल करत दिलबहारला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली.हिच स्थिती मध्यंतरापर्यंत कायम राहिली.
उत्तरार्धात दोन्ही संघांनी आघाडीसाठी जोरदार प्रयत्न केले. ५५ व्या मिनिटाला डी मध्ये सार्थक राऊतने चेंडू हाताळल्याने पंचानी दिलबहार संघास पेनल्टी कीक बहाल केली .या सुवर्णसंधीचा लाभ घेत सनी सनगरने अचूक पेनल्टी मारत संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ज्यादा वेळेस ८२ व्या मिनिटाला निक्सन सॅम्युअलने वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा गोल केला. दोन गोलची आघाडी कायम टिकवत दिलबहारने सामना जिंकून पुढील फेरीत प्रवेश केला. 
दिलबहारच्या जावेद जमादारची सामनावीर तर पाटाकडील ब संघाच्या गुरुराज काटकर यांची लढवय्या खेळाडू म्हणून निवड झाली. या सामन्यात पाटाकडीलच्या यश चव्हाण याला दोन डबल येलो कार्ड झाल्याने त्याला पंचांनी रेड कार्ड दाखवले. पाटाकडीलचे व्यवस्थापक मिथुन मगदूम यांनी पंचांना शिवीगाळ केल्यानंतर त्यांना रेड कार्ड दाखवण्यात आहे. या सामन्यात दिलबहारकडून सतेज साळोखे, अभिषेक भोपळे, सिबिल, रोहन दाभोळकर, जावेद जमादार तर पाटाकडील संघाकडून प्रथमेश पाटील, यश मुळीक ,अजिंक्य मार्लेकर, वैभव देसाई यांचा चांगला खेळ झाला.
दुपारच्या सत्रात झालेल्या पहिल्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाला वेताळमाळ तालीम मंडळाने कडवी झुंज दिली. सामन्याच्या आठव्या मिनिटाला करण चव्हाण बंदरे याने मैदानी गोल केला. मध्यंतरास शिवाजी संघ १-० असा आघाडीवर होता. उत्तरार्धात ५५ मिनिटाला वेताळमाळच्या आकाश माळी याने शिवाजीचा बचाव भेदत मैदानी गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. पूर्ण वेळेत सामना बरोबरीत राहणार असे वाटत असताना ज्यादा वेळेस संकेत साळोखे याने मैदानी गोल करत शिवाजी तरुण मंडळाला २-१ अशा गोल फरकाने विजय मिळवून दिला. शिवाजीच्या करण चव्हाण बंदरे याची सामनावीर तर वेताळमाळच्या आयुष चौगुले याची लढवय्या खेळाडू म्हणून निवड झाली.
शनिवारचे सामने -
सम्राट नगर स्पोर्ट्स विरुद्ध वर्षाविश्वास तरुण मंडळ दुपारी दोन वाजता.
पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध बीजीएम स्पोर्ट्स, दुपारी चार वाजता.