+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही !
Screenshot_20240226_195247~2
schedule30 Jan 23 person by visibility 621 categoryशैक्षणिक
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) सदस्यातून व्यवस्थापन परिषदेवर निवडण्यात येणाऱ्या सात जागेवर शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी बाजी मारण्याची स्पष्ट चिन्ह दिसत आहेत. बुधवारी एक फेब्रुवारी पर्यंत अर्ज माघार घेण्याची मदत आहे. संस्थाचालक, प्राचार्य गटात बिनविरोध निवडीची घोषणा शिल्लक आहे. शिक्षक व पदवीधर गटातील प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक होण्याची स्पष्ट चिन्ह आहेत.
शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटची सभा आठ फेब्रुवारी रोजी आहे. या सभेत व्यवस्थापन परिषदेसाठी आठ सदस्यांची नियुक्ती होणार आहे. त्यापैकी संस्थाचालक
गटातील एक जागा एससी प्रवर्गासाठी आहे. एससी प्रवर्गातील उमेदवार नसल्याने ही जागा रिक्त राहणार आहे. उर्वरित सात जागेसाठी सध्या निवड प्रक्रिया सुरू आहे. सोमवारी (३० जानेवारी) अर्जांची छाननी झाली. एक फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. विविध गटातील निवडी बिनविरोध व्हाव्यात यासाठी विकास आघाडी प्रयत्नशील आहे. विकास आघाडीचे नेते डॉ. संजय डी. पाटील, प्राचार्य क्रांतिकुमार पाटील, प्राचार्य डी.आर.मोरे, प्रताप माने, डॉ. डी. यु. पवार, आर एस अडसूळ, आणि अमित कुलकर्णी यांनी नुकतेच विकास आघाडीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
संस्थाचालक गट खुल्या जागेतून व्यवस्थापन परिषदेवर सिनेट सदस्य पृथ्वीराज संजय पाटील यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडीच्या घोषणाची औपचारिकता राहिली आहे. विद्यापीठ विकास आघाडीचे नेते व डीवायपी शैक्षणिक ग्रुपचे प्रमुख डॉ. संजय डी. पाटील यांचे ते पुत्र आहेत. पदवीधर, प्राचार्य, शिक्षक गटात प्रत्येकी दोन जागेसाठी निवड होणार आहे. शिक्षक गटातील दोन पैकी एक जागा एससी प्रवर्गासाठी आहे. एससी प्रवर्गातून प्रा. बबन शंकर सातपुते यांचा एकमेव अर्ज आहे त्यामुळे त्यांच्या निवडीची औपचारिकता शिल्लक आहे. सातपुते हे सुटा संघटनेचे आहेत. शिक्षकांतील दुसरी जागा खुले सर्वसाधारण गटातील आहे. खुला गटातून सुटाचे प्रा. डी.एन. पाटील, प्रा.मनोज गुजर यांचे उमेदवारी अर्ज वैध आहेत. या दोघांपैकी एकाची उमेदवारी राहील. शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीकडून प्रा. रघुनाथ ढमकले,  प्रा. प्रशांत खरात, शिवाजी विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षण संघटनेने (सुप्टा) सिनेट सदस्य प्रा. शंकर हंगेरीकर, प्रा. माधुरी वाळवेकर, प्रा. शशीभूषण महाडिक या पाच जणांनी मुलाखती दिल्या आहेत. तेव्हा शिक्षक गटातील उमेदवार कोण ? याविषयी उत्सुकता आहे.  शिवााजी विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षक संघटना निवडणूक लढवणार की विकासाकडे सोबत राहणार ? पदवीधर गटातील दोन जागेपैकी एक जागा एससी प्रवर्गासाठी आहे. एससी प्रवर्गातून विकास आघाडीचे अमरसिंह रजपूत यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची निवड निश्चित आहे.  खुल्या गटातील एका जागेसाठी विद्यापीठ विकास आघाडी-विकास मंच कडून स्वागत परुळेकर, अजित पाटील, अभिषेक मिठारी, रतन कांबळे आणि विष्णू खाडे अशा चार उमेदवारांची अर्ज आहेत. तर डावी आघाडी-सुटा-शिवसेना ठाकरे गट अशा संयुक्त आघाडीकडून सिनेटवर निवडून आलेल्या श्वेता परुळेकर यांनी अर्ज भरला आहे. पदवीधर गटाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. समझोता झाला नाही तर विकास आघाडी-विकास मंचचे स्वागत परुळेकर आणि श्वेता परुळेकर अशा लढतीची शक्यता आहे.
प्राचार्य गटातून शेजवळ बिनविरोध ! दुसऱ्या उमेदवारांविषयी उत्सुकता
प्राचार्य गटातून सिनेटमधून व्यवस्थापन परिषदेवर दोन सदस्य असती‌ल. यापैकी ओबीसी गटातून प्राचार्य आर.व्ही.शेजवळ यांचा एकमेव अर्ज आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीची घोषणा शिल्लक आहे. खुला गटातून निवड करावयाच्या एका जागेसाठी न्यू कॉलेजचे प्राचार्य व्ही.एम. पाटील, इस्लामपूर येथील प्राचार्य अरुण पाटील या दोघांचे अर्ज आहेत. प्राचार्य संघटना ही निवडणूक बिनविरोध करणार हे निश्चित आहे. मात्र कोणाला संधी मिळणार याविषयी उत्सुकता आहे. प्राचार्य व्ही.एम.पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.