शिवाजी चौकात दहीहंडीचा आनंदोत्सव, एक लाख ५१ हजाराचे बक्षीस !!
schedule08 Sep 23 person by visibility 234 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळाची दहीहंडी शिरोळच्या गोडी विहीर तालीम मंडळ अध्यक्ष प्रेमी या गोविंदा पथकाने फोडली. संजय गोदडे या गोविंदाने हंडी फोडली. या मंडळाला एक लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. शिवसेना शिंदे गटाच्या पुढाकारातून या दहीहंडीचे आयोजन केले होते. कलाकारांचा नृत्याविष्कार, ढोल ताशा पथकाने रंगत आणली. याप्रसंगी कोल्हापूरच्या रांगडया बाजावर आधारित गाण्याचे लाँचिंग झाले. उपस्थितांनी शिट्टया-टाळयांचा वर्षाव करत गाण्याचे स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी ऋतुराज क्षीरसागर, माजी नगरसेवक जितेंद्र सलगर, रुपेश डोईफोडे, चंद्रेश ओसवाल, निहाल मुजावर, सुहेल बागवान, शिवसेनेचे उदय भोसले, शिवाजी जाधव, रणजित जाधव, किशोर घाटगे, राजू मेवेकरी, कपिल केसरकर आदी उपस्थित होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून या दहीहंडीचे आयोजन केले होते.