+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
Screenshot_20240226_195247~2
schedule07 Mar 23 person by visibility 1280 categoryगुन्हे
पोलिसांनी ४८ तासात केला यशस्वी तपास
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिर परीसरातून सहा वर्षाच्या मुलास पळवून नेणाऱ्या दांपत्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ४८ तासात बेड्या ठोकल्या. मोहन अंबादास शितोळे (वय ५०) आणि छाया मोहन शितोळे (३०, रा. जवळा, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या दांपत्याचे नाव आहे.
पोलिस अधीक्षक शैलश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत गुन्ह्याची उकल कशी केली याची माहिती दिली. सुषमा राहूल नाईकनवरे (रा. शिवाजीनगर, ता. खंडाळा, जि. सातारा) या सहा वर्षाच्या मुलाला घेऊन तीन मार्च रोजी आदमापूर येथे बाळूमामांच्या दर्शनासाठी आल्या होत्या. तीन तारखेला आदमापुरात मुक्काम करुन चार मार्च रोजी दर्शन घेण्यासाठी त्या थांबल्या होता. चार मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता सुषमा नाईकनवरे आंघोळीसाठी गेल्या असता मंदिराच्या हॉलमध्ये त्यांच्या खोली शेजारी राहणाऱ्या एका दांपत्याने त्यांच्या सहा वर्षाच्या मुलास पळवून नेले. त्यानंतर सुषमा यांनी मुलगा पळवून नेल्याची भुदरगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
देवदर्शनाकरिता यात्रेच्या ठिकाणी आलेल्या लहान मुलास पळवून नेल्याची गंभीर घटना घडल्याने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, गडहिंग्लज उप विभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश दिले.
विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या आदेशानंतर डीवायएसपी राजीव नवले, एलसीबीचे निरीक्षक वाघमोडे, भुदरगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर, एलसीबीचे उप निरीक्षक विनायक सपाटे, गडहिंग्लज सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील, उपनिरीक्षक युवराज जाधव, विक्रम वडणे, सतीश मयेकर मयेकर यांच्या नेतृत्वाखाली सात पोलिस पथके तयार केली.
गुन्ह्याचा तपास करत असताना एलसीबीच्या पथकास संशयित दांपत्य भुदरगड ह्द्दीतून कर्नाटकातील निपाणी, चिकोडी, अंकली, चिंचणी मायाक्का मार्गे मिरजकडे गेल्याचे आढळून आले. पोलिसांनी या मार्गावरील ९० ते ९५ ठिकाणावरील सीसीटीव्ही, हॉटेल, लॉजेस, धर्मशाळा, रेल्वे आणि बस स्थानकांची तपासणी केली. पोलिसांना तपास करत असताना संशयित दांपत्य पळवून नेलेल्या सहा वर्षाच्या मुलासह मोटार सायकलवरुन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले. संशयितांकडे असलेल्या मोटार सायकलचा नंबरही मिळाला. पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास केला असता मोहन अंबादास शितोळे हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली. तांत्रिक माहितीच्या आधारे मोहन शितोळे आणि त्याची पत्नी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जवळा येथे रहात असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक सपाटे, पोलिस अंमलदार सुरेश पाटील, रणजीत पाटील, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, अनिल जाधव, माहिला पोलिस सारीका मोटे यांनी जवळा येथे संशयित वास्तव्य करत असलेल्या ठिकाणावर छापा टाकून सहा वर्षाच्या मुलाला सुखरुपपणे ताब्यात घेतले. मोहन आणि त्याची पत्नी भुदरगड पोलिसांच्या ताब्यात दिले. या गुन्ह्याच्या तपासात तुकाराम राजीगरे, अजय काळे, संजय पडवळ, हेही सहभागी होते.
पत्रकार परिषदेला अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, गडहिंग्लज डीवायएसपी राजीव नवले, एलसीबी निरीक्षक वाघमोडे, उप निरीक्षक सपाटे उपस्थित होते.