महाविद्यालयीन युवकाचा पंचगंगा नदीत बुडून मृत्यू
schedule06 May 23 person by visibility 401 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
मित्रासमवेत पोहायला गेलेल्या पृथ्वीराज चंद्रकांत गवळी (वय २०,रा.गवळी गल्ली,शनिवार पेठ) या महाविद्यालयीन युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली होती. शनिवारी दुपारी एक वाजता त्याचा मृतदेह सापडला
पृथ्वीराज गवळी आपल्या समवेस्क मित्रांसमवेत शुक्रवारी दुपारी पंचगंगा नदीत पोहायला गेला होता. त्याला पोहायला येत होते पण दम लागल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे त्याला वाचवण्यासाठी त्याच्या मित्रांनी अथक परिश्रम घेतले पण तो पाण्यात बुडाला. अग्निशामक दलाकडून शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मृतदेहाचा शोध सुरू होता.
आज शूसकाळी सात वाजल्यापासून अग्निशामक दलान शोध मोहिम सुरू केली होती. अखेर जीव रक्षक दिनकर कांबळे या पाणबुड्यानं अर्धा तास परिश्रम घेऊन पृथ्वीराज गवळी याचा मृतदेह बाहेर काढला. सीपीआरमध्ये शव विच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी उशिरा अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शनिवार पेठ परिसरातील गवळी गल्लीत राहणारा पृथ्वीराज गवळी हा कुटुंबियांसमवेत राहत होता. त्याचे वडील चंद्रकांत गवळी हे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. तर आई खाजगी संस्थेत काम करते. त्यांना पृथ्वीराज हा एकुलता एक मुलगा होता. बारावीनंतर त्याने इंजीनियरिंगला प्रवेश घेतला होता. सुट्टीच्या दिवशी तो पंचगंगा नदीत मित्रांसमवेत पोहायला गेला होता. पोहताना त्याला दम लागल्याने नाका - तोंडात पाणी जाऊन त्याचा बूडून मृत्यू झाला.