गोशिमातर्फे स्वच्छता अभियान, तीन गटात विजेते निवडणार
schedule07 Oct 24 person by visibility 186 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनतर्फे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त औद्योगिक वसाहतीमध्ये स्वच्छता अभियान राबविले. राज्य सरकारच्या स्वच्छ भारत मिशनच्या नियोजनानुसार औद्योगित वसाहत परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात येणार आहे. गोशिमातर्फे लहान, मध्यम व मोठे अशा तीन गटात विजेत्यांचा गौरव होणार आहे.या स्वच्छता अभियानप्रसंगी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आय ए नाईक, उपअभियंता अजयकुमार रानगे, गोशिमा अध्यक्ष् स्वरुप कदम, उपाध्यक्ष सुनील शेळके, सचिव संजय देशिंगे, खजिनदार अमोल यादव, कोल्हापूर फौंड्री अँड इंजिनीअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष दीपक चोरगे, संचालक रामचंद्र लोहार, नचिकेत कुंभोजकर, राजवर्धन जगदाळे, बंडोपंत यादव, अनिरुद्ध तगारे, रणजित पाटील, सल्लागार संचालक मोहन पंडितराव, विनयकुमार चौगुले, पद्मराज पाटील आदी उपस्थित होते.