+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule21 Apr 24 person by visibility 260 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  कोल्हापूर शहरानेही कायमच शिवसेनेला मताधिक्य दिले आहे. आताही महायुती उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांना विजयी करण्यास शहरवासीय सज्ज झाले आहेत, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
 महायुतीचे शिवसेना उमेदवार खासदार प्रा.संजय मंडलिक यांच्या कोल्हापूर उत्तर, दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रचाराचा शुभारंभ रविवारी, कोतीतीर्थी मंदिर येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने करण्यात आला. यावेळी जय भवानी जय शिवाजी, "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. यानंतर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर, महायुती उमेदवार प्रा.संजय मंडलिक, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचार मोहिमेची सुरवात करण्यात आली. क्षीरसागर यांनी मंडलिक यांच्या जिल्ह्यातील प्रचाराची धुरा सांभाळताना खासकरून कोल्हापूर उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असून, शहरात शिवसेनेची हायटेक प्रचार यंत्रणा सज्ज केली आहे. 
 क्षीरसागर म्हणाले ‘लोकसभा निवडणुकीसाठी देशात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीने "अब कि बार ४०० पार" हा नारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी देवून कोल्हापूरच्या विकासाला चालना देण्याचे काम केले. त्यामुळे शहरातील सुजाण मतदार विरोधकांच्या टिका- टिप्पणीकडे दुर्लक्ष करून महायुतीचे शिवसेनेचे जिल्ह्यातील दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करतील.’ क्षीरसागर म्हणाले, ‘शहरात ४० कॉर्नर सभा, प्रभागवार प्रचारफेऱ्या, व्यक्तिगत भेटीगाठी, मॉर्निंग वॉक मंदिर भाजी मंडई अशा वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांच्या भेटीगाठींवर जोर दिला जाणार आहे. यासह मिसळ पे चर्चा द्वारे भागाभागात नागरिकांची मते जाणून घेण्यात येणार आहेत.’
यावेळी शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, भाग्यश्री शेटके,  किरण नकाते, रहीम सनदी, शिवसेना महिला आघाडीच्या महानगरप्रमुख मंगल साळोखे,  पूजा भोर,  साक्षी रांगणेकर,  अमरजा पाटील, नम्रता भोसले,  तेजस्विनी घाटगे, पूजा कामते, शारदा भोपळे, गौरी माळतकर, गीता भंडारी, मंगल कुलकर्णी, पूजा शिंदे, निवेदिता तोरस्कर, शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, रमेश खाडे, उदय भोसले, सुनील जाधव उपस्थित होते.