+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule23 Apr 24 person by visibility 88 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
कोल्हापूर लोकसभेचे इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सून व युवराज संभाजीराजे यांच्या पत्नी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांचा चंदगड तालुक्यात प्रचार दौरा सुरु आहे. या दौऱ्याप्रसंगी त्यांच्या मोटारीचे सारथ्य विधानसभेचे माजी सभापती स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांची कन्या डॉ. नंदा बाभुळकर यांनी सारथ्य केले. हा प्रसंग ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत होता. 
सध्या लोकसभा निवडणुकीचे धामधूम सुरू आहे. अधिकाधिक लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी त्यांच्या समर्थक मेहनत घेत आहेत. गाव आणि तालुकानिहाय प्रचार मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू त्रपती यांच्या प्रचारासाठी त्यांच्याा स्नुषा संयोगिताराजे याही हिरिरीने प्रचार करत आहेत. ग्रामीण भागाचा दौरा करत आहेत. नुकताच त्यांनी चंदगड तालुक्याचा दौरा केला. याा दौऱ्यात विधानसभेचे माजी सभापती स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या डॉक्टर नंदा बाभुळकर सहभागी होत्या. लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. 
शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी त्यांनी कानडेवाडी येथे मोठा मेळावा ही घेतला होता. या मेळाव्याच्या माध्यमातून डॉ. बाभूळकरांनी राष्ट्रवादी पक्षासह कुपेकर गटाचे शक्ती प्रदर्शनही घडवले.  शिवाय महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचाराच्या ठिकठिकाणी प्रचार मेळाव्यात सहभागी आहेत. संयोगिताराजे आणि  डॉ. नंदा बाभूळकर त्याने संयुक्तपणे चंदगड तालुक्यात प्रचार दौरा केला. त्यांच्या या प्रचार दौऱ्याला मतदारांचा भरभरून प्रतिसाद लाभला.