महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : उमेदवारी जाहीर होऊन अर्ज दाखल करण्याची वेळ जवळ आली तरी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेसमधील वाद काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. काँग्रेसच्या माजी नगरसेवकांसह २७ जणांनी एकत्र येऊन कोल्हापूर उत्तरचा उमेदवार बदला अशी मागणी जिल्हाध्यक्षव आमदार सतेज पाटील यांच्याकडे केली आहे. यामध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांचाही समावेश आहे. महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसकडून राजेश लाटकर यांना कोल्हापूर उत्तरमधून उमेदवारी जाहीर झाली आहे.
‘कोल्हापूर उत्तर’मध्ये यंदा कार्यकर्ता पॅटर्न राबविणार अशी घोषणा आमदार पाटील यांनी इच्छुकांच्या मुलाखती दरम्यान सांगितल्या. काँग्रेसकडून विद्यमान आमदार जयश्री जाधव, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, राजेश लाटकर, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, बांधकाम व्यावसयिक आनंद माने, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, दुर्वास कदम यांचा समावेश होता. काँग्रेसकडून २६ ऑक्टोबर, शनिवारी रात्री लाटकर यांची उमेदवारी झाली.
कार्यकर्त्याला तिकीट मिळाले म्हणून अनेकांनी स्वागत केले. दुसरीकडे उमेदवारीवरुन काँग्रेस अंतर्गत नाराजी नाट्य सुरू झाले. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तासाभरातच चक्क काँग्रेस कमिटीच्या गेटवर दगडफेकीचा प्रकार घडला. दुसऱ्या दिवशी, रविवारी लाटकर हे शहराध्यक्ष चव्हाण यांना भेटायला गेल्यावर कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.दरम्यान रविवारी रात्री काँग्रेसच्या २७ माजी नगरसेवकांनी कोल्हापूर उत्तरमधील उमेदवारी बदला अशी मागणी जिल्हाध्यक्ष पाटील यांनी केली आहे. ‘हा लादलेला उमेदवार आहे. मतदारसंघात त्यांच्या उमेदवारीवरुन संभ्रमावस्था आहे. हा उमेदवार तातडीने बदलावा’असे उमेदवारीत म्हटले आहे.
निवेदनावर इच्छुक व काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, माजी महापौर निलोफर आजरेकर, संजय मोहिते, अर्जुन माने, संदीप नेजदार, इंद्रजीत बोंद्रे, प्रतापसिंह जाधव, राजाराम गायकवाड, मधुकर रामाणे, अभिजीत चव्हाण, दिपा मगदूम, उमा बनछोडे, प्रतिक्षा धीरज पाटील, वहिदा सौदागर, छाया उमेश पोवार, रिना कांबळे, मेहजबीन सुभेदार, नियाज खान, पूजा नाईकनवरे, जयश्री चव्हाण, भूपाल शेटे, अफजल पिरजादे, जय पटकारे, दुर्वास कदम, संदिप सरनाईक, शेखर जाधव आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.